ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये आविष्कार संशोधन कन्व्हेन्शन कार्यशाळा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी रायगड
ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये आविष्कार संशोधन कन्व्हेन्शन कार्यशाळा संपन्न
जिज्ञासा ही संशोधनाची जननी
तुषार थळे, प्रतिनिधी रायगड
अलिबाग: शनिवार, दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी,आय.क्यु.ए.सी.ऑफ ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज आणि आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन ,मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन जिल्हास्तरिय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन,ॲफिसर ऑन स्पेशल ड्युटी डॅा.मिनाक्षी गुरव,हर्बल रिसर्च लॅब ॲण्ड ॲनिमल टेस्टिंग इन्चार्ज डॅा.सुनिता शैलजन, इन्स्टिट्युट ऑफ ॲडव्हान्स ट्रैनिंग ॲण्ड रिसर्च इन इंटरडिसिप्लिनरी सायन्सेस डायरेक्टर डॅा.ससिकुमार मेनन तसेच जिल्हा समन्वयक डॅा.दिनेश भगत आणि सहाय्यक समन्वयक डॅा.जगदिश ठाकूर,जे.एस.एम.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॅा.सोनाली पाटील ,रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यामध्ये सहभागी होऊन व्यक्तिमत्व विकास साधत समाजाच्या विकासामध्ये हातभार लावावा असे आवाहन केले.लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक सादर करताना विद्यापीठाने अश्याप्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना संशोधन करण्यास प्रवृत्त करावे असे मत मांडले.
कार्यशाळेमध्ये रायगड ( विभाग ७)मधीलआर्टस्,सायन्स,
कॅामर्स,लॅा,फार्मसी,हॅाटेल मॅनेजमेन्ट,
इंजिनिअरिंग इ.विद्याशाखांमधील २० महाविद्यालयातील ४० प्राध्यापक आणि ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यशाळेचे पाच सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये आविष्कारमध्ये सहभागी होण्यासाठीचीपात्रता,नियमावली,
बक्षिसे,स्तर इ.विषयी माहिती देण्यात आली.प्रत्यक्ष आविष्कारसाठी कोणत्या पध्दतीचे संशोधन आवश्यक आहे,संशोधनासाठी समस्या,पध्दती निश्चित करणे तसेच उपाययोजना सुचविणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सहभागी प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संघ तयार करुन, संशोधनासाठी समस्या देऊन संशोधन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.शेवटच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे पॅावर पॅाईन्ट प्रझेंटेशन संघांमार्फत करण्यात आले.चांगल्या प्रकारची मांडणी केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.संपूर्ण पाच संत्रांमध्ये डॅा.मिनाक्षी गुरव,डॅा.सुनिता शैलजन आणि डॅा.ससिकुमार मेनन या तज्ञांनी विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील,उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील,सेक्रेटरी श्री.गौरव पाटील, लॅा.कॅालेजच्या प्राचार्य ॲड.नीलम हजारे, आय.क्यु.एसी.समन्वयक डॅा.संदिप घाडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.निलम म्हात्रे यांनी आविष्कार समन्वयक म्हणून काम पाहिले.लॅा कॅालेज आणिजे.एस.एम.कॅालेज मधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.सिमंतीनी ठाकूर,प्रा.पियुषा पाटील,प्रा.चिन्मय राणे,प्रा.कौशिक बोडस,प्रा.सुरज पुरी,या समिती प्रमुखांच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन केले.



