0
4
8
2
9
0
लेकरू
देवा तू किती सुंदर सुंदर
सुंदर हे जग निर्मियले
पक्षीही सुंदर, प्राणीही सुंदर
सुंदर ते रूप, किती तुझे
सुंदर तो सूर्य, सुंदर ते नभ
चंद्र, तारांगण सुंदर ते
सुंदर धरती, सुंदर ती शेती
जीवन ती देती नदीमाय
सुंदर ही फळे, सुंदर ही फुले
सुंदर लेकरे, देवा तुझी
सुंदर पाखरू, सुंदर वासरू
तसे मी ‘लेकरू’ आईचे.
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
0
4
8
2
9
0



