कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
बाजारीकरण; बी.एस.गायकवाड
0
4
8
2
9
3
बाजारीकरण
खाजगीकरणच्या नावे सुरू
सर्वच क्षेत्रात बाजारीकरण
शिक्षणाचा बाजार मांडला
चालूच आहे खाजगीकरण
घटते आहे विद्यार्थी संख्या
जिल्हा परिषदेच्या शाळेची
मक्तेदारी सुरू केली नेत्यांनी
शिक्षण संस्था उघडण्याची
मोठाल्या रक्कमा डोनेशन
नावे फिस म्हणून घेणे सुरू
पालकाला प्रश्न पडतात मग
कोणत्या संस्थेत प्रवेश करू
मोठमोठाल्या इमारतीमध्ये
वर्ग ही भरतील शिकवणीचे
गरिबांचे तर राहू द्या बाजूला
कंबरडे मोडे मध्यमवर्गींयांचे
लगेबाजी करून ऍडमिशन
तरी द्यावं लागे सारं डोनेशन
गुणवत्तेला मारतील गोळी
करून घेतील पुढचे प्रमोशन
अवघड होऊन बसलंय सारं
प्रत्येक क्षेत्रात बाजारीकरण
व्यवस्था पार कोलमडून गेली
तरीपण सुरूच अंधानुकरण
बी एस गायकवाड
पालम,परभणी
==========
0
4
8
2
9
3



