
0
4
8
2
9
0
वाटते मज जरासे
वाटते मज जरासे गाणे मधुर गावे
छेडीत हृदयतारा अंतरंगी सुखावे…
अनंतची होरपळ सोसवेना पहार
अंगारल्या धरेवर गार झुळूक व्हावे…
जलशिडकावा आणि गंधाळली भुई
मनभावन सौंदर्यसाज सुख जगून घ्यावे…
निरागस जाणिवांचे चिमणपंख पसरावे
वाटते मज जरासे ते बालपण जगावे…
अस्ताव्यस्त झिंज्या आज बाजूस सारावे
वाटते मज जरासे चैत्रबहर व्हावे…
वाटते मज जरासे वेडे जरूर व्हावे
अंधार घालवाया पेरून स्वप्न जावे…
आशा कोवे-गेडाम
वणी जि.यवतमाळ
============
0
4
8
2
9
0



