Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणे

संजय अहिवळे यांना समर्पण इंटरनॅशनल ॲवाॅर्ड प्रदान

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

संजय अहिवळे यांना समर्पण इंटरनॅशनल ॲवाॅर्ड प्रदान

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: (दि 23 जानेवारी): स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांच्या विकासासाठी प्रदीर्घ काळ योगदान देणा-या संजय अहिवळे यांना समर्पण इंटरनॅशनल संस्थेतर्फ, संस्थापक-अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडी – महिला विभागाच्या कार्याध्यक्ष भारती महाडिक यांच्या शुभहस्ते समर्पण इंटरनॅशनल ॲवाॅर्ड प्रदान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष सौ.वसुधा नाईक होत्या. दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या शहर अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सौ.नीता अहिवळे यांचाही सन्मान सौ.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

शीतल नाईक आणि वैभव नाईक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनियतकालिकाच्या विश्वविक्रमी 624 आणि 625 व्या विशेषांकाचे प्रकाशन संजय अहिवळे आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. संजय अहिवळे यांनी पुरस्काराच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घकालिन कार्याच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे