0
4
8
2
9
0
माझे आकाश
नजरेत तिच्या सामावते
माझेच निरभ्र आकाश
डोळ्यांत तिच्या विसावतो
माझाच गंध प्रकाश
ती साठवते मायेचे
भांडार तिच्या पोटी
माझ्या अपेक्षा पूर्तीचे
गाणे तिच्या ओठी
माझी स्वप्ने सारी
तीच पूर्ण करू पाही
तिच्याविना मी कधी
माझा उरत नाही
नजरेत तिच्या आहे
माझ्या सुखाची धडपड
तिच्यामुळेच मी खंबीर
तीच माझा आधारवड
तिच्याविना मी उरतो
केवळ एक शून्य
ती आली आयुष्यात
केवढे माझे पुण्य
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
========
0
4
8
2
9
0



