0
4
8
2
8
4
मन पाखरू पाखरू
मन पाखरू पाखरू
क्षणी जाई आभाळात
लपकता ही पापणी
येई सागरी तळात
मन पाखरू पाखरू
मारे गगन भरारी
वर पाहता पाहता
करे वाऱ्यावर स्वारी
मन पाखरू पाखरू
क्षणी जाई हो जंगली
पाय टेकताच तिथे
दिसे परत महाली
मन पाखरू पाखरू
साता समुद्राच्या पार
येता आठवण त्यासी
केलं जवळी हो घर
मन पाखरू पाखरू
झालं भजनात दंग
ओठी नाम विठ्ठलाचे
लागे सज्जनांचा संग
मन पाखरू पाखरू
जाई दुसऱ्याच्या कायी
नाही पटलं कपट
आलं लागलीच पायी
मन पाखरू पाखरू
घेते आभाळाचा ठाव
येता लगेच परत
करी काळजात घाव
प्रा. दिनकर झाडे
गडचांदूर , जिल्हा चंद्रपूर
0
4
8
2
8
4



