Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 2

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि २४) माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा, जिवलग मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटण्याचा आणि शाळेच्या, महाविद्यालयाच्या दिवसात हरवून जाण्याचा एक भावनिक आणि आनंदी सोहळा असतो.

रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील इयत्ता १२ वी च्या १९९४ -९५ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अलिबाग तालुक्यातील रहाटले गावातील निसर्गरम्य वातावरणातील एका सुंदरशा फार्म हाऊसवर उत्साहात संपन्न झाला.

या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संजय म्हात्रे व भार्गव भोईर या माजी विद्यार्थ्यांचे फार मोलाचे योगदान आहे. तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा दिला. मोठ्या कालावधीनंतर एकमेकांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेतले ते जुने दिवस, शिक्षकांची भीती, एकमेकांबरोबर केलेली मजा – मस्ती हे सर्व आठवून सर्वांचे मन पुन्हा शालेय जीवनात रमले.

या मेळाव्याच्या मुख्य उद्देश केवळ जुने मित्र भेटण्यासाठी नसून एकमेकांच्या प्रगतीची माहिती घेणे, सामाजिक कार्यासाठी एकत्र येणे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे व एकमेकांना अडीअडचणीत मदत करणे हा होता. जुने किस्से, नाच गाणे, फोटो सेशन यामुळे या स्नेहमेळाव्यात उत्साहपूर्ण वातावरण होते. अनेक वर्षांनी एकत्र भेटल्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हा मेळावा केवळ जुन्या मित्रांना भेटण्याचा नाही तर आपल्या जडणघडणीच्या दिवसांचे आभार मानण्याचा एक भावनिक कार्यक्रम ठरला. शेवटी सर्वांनी स्नेहभोजन केले. यानंतर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे स्नेह मेळावा आयोजित करून एकत्र येण्याचे सर्वांनी ठरविले आणि एकमेकांचा निरोप घेतला.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे