हितवर्धक मंडळाच्या आवासमध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
हितवर्धक मंडळाच्या आवासमध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न
सचिव प्रभाकर म्हात्रे यांनी केले ध्वजारोहण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
रायगड/ अलिबाग: शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी परेड करून आमंत्रित केले व सचिव प्रभाकर म्हात्रे यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर विशाल पाटील सर यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले. त्याला यतिश शिंदे सर यांनी तबला साथ केली. त्यानंतर भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा व असाक्षर मुक्त गाव शपथ घेण्यात आली. त्यानंतर सचिव प्रभाकर म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे, कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॕडम, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ग्रुप – ग्रामपंचायत, आवास येथे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्व प्रथम तेथे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी परेड करून आमंत्रित केले व सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर विशाल पाटील सर यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले. त्याला यतिश शिंदे सर यांनी तबला साथ केली. त्यानंतर भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा व असाक्षर मुक्त गाव शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमास ग्रुप – ग्रामपंचायत सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, ग्रुप ग्रामपंचायत, आवास सर्व आजी माजी सदस्य, ग्रामसेवक जयेश पाटील, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे, खजिनदार सुवर्ण कांबळी, कार्यकारीणी सभासद दिपक राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/ माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा प्रमोदिनी पाठक मॕडम, प्राथमिक विभाग शिक्षक प्रतिनिधी सुप्रिया राऊळ मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि आवास ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले.



