Breaking
ई-पेपरकवितानागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध

संकटातील सत्य

डॉ. बालाजी राजूरकर हिंगणघाट जि. वर्धा

0 4 8 2 9 3

संकटातील सत्य

काय होईल माणसाचे?
मनात सतत विचार येती.
मृत्यू झाले आता सोपे,
नवीन रोगाची झाली भरती.

करोनाच्या महामारीने
जगणे शिकविले खरे;
संकटात नसते सोबती,
आप्तेष्ट धरती अंतर बरे.

कर्करोग गिळू पाहतो
संपूर्ण मानवजातीला;
बिघडे पर्यावरण संतुलन,
दोषही मानवजातीला.

न मुजोरी निसर्गापुढे,
कळले असेल तुला;
विज्ञानाचा अविष्कारही,
दिसतो मूल्यहीन झालेला.

मिळाले आयुष्य जेवढे,
तेवढेच जग आनंदाने;
मित्रा, निसर्गाशी भांडणे
नसते कधीच परवडणारे.

डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे