आ.कृपाल तुमाने यांना निवेदन; समस्या दूर करण्याची मागणी
प्रभाग क्रमांक 32 मधील विविध समस्यांचा प्रेम मुंदाफळे यांनी निवेदनात केला उल्लेख

आ.कृपाल तुमाने यांना निवेदन; समस्या दूर करण्याची मागणी
प्रभाग क्रमांक 32 मधील विविध समस्यांचा प्रेम मुंदाफळे यांनी निवेदनात केला उल्लेख
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि १६ मार्च) शहरातील दक्षिण नागपूर भागातील मानेवाडा रोड बजरंग नगर, कैलाश नगर व ज्ञानेश्वर नगर व सावित्रीबाई फुले नगर नागपूर या सर्व वस्तीतील सामाजिक समस्यांवर निवेदन देण्यात आले.
बजरंग नगर, नागपूर येथील गल्ली नं. १ ते १७ मध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नसून रस्ते अधिक खळबळीत असल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे व गट्टु लावणे आणि झाडांची छाटणी करणे तसेच वस्तीतील नाली व नाला यांची खोली करुन व चौडाई कमी करुन नाल्यावर स्लैप टाकून रोड चौडा करण्यात यावे. तसेच रस्त्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे व सांडपाणी रस्त्यांवर वाहतं त्यामुळे जीवजंतुची निर्मिती होऊन परिसरातील नागरीकांमध्ये आजार उद्भवत आहेत.
केर-कचरा अनेक ठिकाणी साचला असून तो सडल्याने त्यातून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकते. परिसरातील नागरिकांच्या जीवाचा धोका लक्षात घेता वरील समस्येवरील लक्ष केंद्रीत करून समस्येचे योग्यरित्या निराकरण करणे आवश्यक आहे. बजरंग नगरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलं गार्डन पासून वंचित आहेत.
तसेच दक्षिण नागपुरातील मानेवाडा रोडवरील बजरंग नगरातले उद्यान गायबच झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचीही चौकशी करण्यात यावी. हनुमान नगर झोन सहआयुक्त व हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन देण्यात आले होते. परंतु आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कामे झाले नाही. या सर्व बाबींवर लक्ष वेधावे व नागरिकांची भेट घ्यावी जेणेकरून त्यांना समाधान वाटेल याप्रसंगी रेखा थुल उपस्थित होत्या.



