Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

उताणा रे…!

सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर , नागपूर

0 5 1 7 9 6

उताणा रे…!

इजरायलला केला बाप रे,
आणि भारताला केली माय रे…
कसा आहे हा प्रधान सेवक,
साऱ्या विश्वात होते थू थू हाय रे…१

नाही मनाची तर जनाची काही,
बाळगत जावी शरम लाज रे…
देशास बदनामी चक्री लोटून,
मिटवू नये आपुली गुप्त खाज रे…२

ठेवले तेवढे पुरे झालेत,
देशाला परदेशी गहाण रे…
स्वतःच्या वाचवाया जीवाला,
का करता भारतास लहान रे…३

सत्तेच्या माजाचा कायम नसे,
संपेल कधीतरी हा विसावा रे…
आज जो उजवा आहे तोचि,
उद्या असणार नाही का डावा रे…४

नको अहंकार नको मत्सर,
देशहितास सर्वश्रेष्ठ माना रे…
‘सुधाकरा’ रावणाचाही अहं,
बघितला का पडला उताणा रे…५

सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर , नागपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे