0
4
8
2
9
0
स्वरांगण
विश्वची वाटे स्वरांगण मजला
येई नादब्रह्माची अनुभूती
विज्ञानही साक्ष देतो
ब्रम्हांडात गुंजे तरंग…
गुंजतोय ओमकार ध्वनी…
अखंड सृष्टीच भासे जणू
स्वर चैतन्य रागिनी….
सृष्टीच्या स्वरात दडले स्वरांगण
वेलींच्या लहरण्यात ….
फुलांच्या बहरण्यात….
पाण्याच्या खडखळण्यात ..
वाऱ्याच्या वेगात..
भ्रमराच्या गुंजारवात..
कोकिळेच्या मंजुळ स्वरात..
प्रत्येक जीविताच्या स्वरात.. स्वरांगण
सृष्टीच प्रेरणा असेल कां?सामवेदाची…
सृष्टीच असेल का? जन्मदात्री सप्तसुरांची,..
आरोह अवरोहाची..
मध्य , मंद्र ,तार ,सप्तकांची…
की, सृष्टीरचेत्याने केला हा
श्रवणीय स्वरांगण साकार ..
झळाळत उठले सप्तस्वर झंकार
तल्लीन होऊन मी यती…
घेते आज नादब्रह्माची अनुभूती…
सुरेखा कोरे
ता.जि.नागपूर
========
0
4
8
2
9
0



