भ्याडतेच्या गोळ्या मानवतेला कधीच संपवू शकत नाही”: सविता पाटील ठाकरे
बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“भ्याडतेच्या गोळ्या मानवतेला कधीच संपवू शकत नाही”: सविता पाटील ठाकरे
बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“भ्याड हल्ल्याच्या राखेतही तेज आहे या मातीत…
रक्त सांडलं वीरांचं पण जळते ज्योत प्रत्येक प्रीतीत…,
दिल्लीच्या धुरात मिसळले असंख्य स्वप्नांचे कण..
कितीही जोमाने या आमचं मनच आहे रणांगण…”
दिल्लीच्या हृदयावर पुन्हा एकदा भ्याड हल्ला झाला, जिथे निष्पाप नागरिक आपले आयुष्य जगत होते, तेथे दहशतीच्या काळया सावल्या पसरल्या. मानवतेच्या छातीत खंजीर खुपसणाऱ्यांनी पुन्हा हे सिद्ध केलं की त्यांना ना धर्म आहे ना माणुसकी!! पण त्यांना हे कुठे कळतं हा आमच्या हृदयावर वार आहे असे अनेक वार आम्ही झेलले आहेत. पुलवामा असो की उरी हल्ला… मुंबईचा २६/११ असो की पठाणकोट.. संसदेवरील हल्ला असो की मुंबईतील ट्रेन ब्लास्ट.. आम्ही कुठे थांबलो ?अरे आम्ही स्वल्पविराम घेतो, तो ही नव्या दमानं पुढं जाण्यासाठी. कारण आम्ही संपणारे नाहीत तर संपवणारे आहोत. आम्हाला ‘थांबला तो संपला’ ही शिकवण आहे.
अरे भ्याडांनो… तुमचा हा नीच विचारसरणीचा उन्मात, भीतीचा चेहरा आणि धैर्याच्या अभावाची लाजिरवाणी छाया..आम्ही नाही डगमगत. तुमचं हे कृत्य म्हणजे माणुसकीचा सूर्य रक्ताच्या धुक्यात लपवणं.. पण सूर्यच तो..कसा लपेल? जरी रक्तानं माती लाल झाली तरी नव्या अंकुरांनी सत्याचा झेंडा फडकवावा ही आम्हा भारतीयांना भारत मातेची शिकवण आहे. शौर्य,बलिदान व शांततेचा संदेश ही आमची त्रिसूत्री आहे. तुमच्या भ्याडपणामुळे आम्ही अश्रू आणि रक्ताने भिजलेले दिवस पाहिले आहेत. पण मी ठामपणे सांगेन, की “आम्ही भयाने नव्हे तर अभिमान व आत्मबलाने जगणारी माणसं आहोत”. अरे तुमच्या कित्येक हल्यांनी भलेही आमच्या इमारती कोसळल्या असतील, परंतु आमचा आत्मा अमर आहे. भ्याडतेच्या गोळ्या मानवतेला कधीच संपवू शकत नाही, कारण जिथे आमचा एक सैनिक उभा असतो तिथे संपूर्ण भारत जागा असतो .
रसिक सृजनहो… नुकताच दिल्ली येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘मराठीचे शिलदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी “भ्याड हल्ला” हा विषय दिला. विषयाला न्याय देताना सर्वांनी देश प्रेमासह आपली निडरता अधोरेखित केली. खरच गरज आ



