चित्रकविता
अंधारलेल्या मनाला!ढगाळलेल्या तनाला !!
मंतरलेल्या कणांना ! मोहरलेल्या क्षणांना !!
खतांच्या प्रचंड ढिगांना ! स्वच्छंदी त्या खगांना !!
सुकलेल्या त्या ओठांना ! देशील का रवी तू दिलासा ? !!१!!
आकाशी ढग काळे ! बंद कर तुझे चाळे !!
थंडगार वाहू दे वारे ! आनंदी होतील सारे !!
ऊन-सावलीचा खेळ ! जमू दे जीवनाचा मेळ !!
उसंत घेऊनी थोडा वेळ ! देशील का रवी तू दिलासा ? !!२!!
रवी सुखावला मनी ! वर्षाव झाला रानोरानी !!
ऐकून माझी करूण वाणी ! सगळीकडे पाणीच पाणी!!
मन बहरले अंग शहारले ! फुलवूनी मोर पिसारा !!
आसमंती आनंद सारा ! पिऊन पावसाच्या धारा !!३!!
अंगावरती नटखट वारा ! दिला रवीने दिलासा !!४!!
आकाशी आहे एकचतारा ! बरसवतो तो प्रेमधारा !!
प्रेम रवीचे भाव कवीचे ! झाडे लावा झाडे जगवा !!
झाडांची जर होईल वाणवा ! रवीराज मग पेटवेल वणवा !!
वेळीच जागा हो मानवा ! रवीला पेटवू देऊ नको वणवा !!
विचार करा सर्वांनी जरासा ! दिला ना रवीने दिलासा !!
पर्यावरणाचा कराल नाश ! मृत्यूचा आवळेल तो फास !!
रवीला येणार नाही राग ! असेच मानवा संयमाने वाग !!५!!
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========



