फिराया,खंडाळझरी येथे विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी
बसस्थानक व्यवस्थापकाला एका शिष्टमंडळाचे निवेदन
फिराया,खंडाळझरी येथे विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी
बसस्थानक व्यवस्थापकाला शिष्टमंडळाचे निवेदन
रजत डेकाटे प्रतिनिधी
भिवापूर/ मालेवाडा
भिवापूर: (दि ४): मागील काही दिवसापासून भिवापूर तालुक्यातील नाड, शिवणफळ ,तांडा येथील विद्यार्थी नागरिकांचे येणे जाणे अडचणीचे ठरत असल्याने आणि वाघाची दहशत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या परिसरात वाघाच्या दहशतीचा खूप मोठा वावर आहे. विद्यार्थ्यांनी शाळेला जायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून सदर मागणीचे निवेदन बस स्थानक व्यवस्थापकाला देण्यात आले. नाड,शिवणफळ,तांडा या परिसरातील विद्यार्थी जीवघेणा प्रवास करीत आहे. विद्यार्थ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पिराया येथील विद्यार्थ्यांसाठी उमरेडला येण्यासाठी व जाण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी व खंडारझरी येथे बस फेरी सुरू करावी अशी मागणी बसस्थानक व्यवस्थापक कोकिळा डपरे यांना शिष्टमंडळाने केली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे, नागेश्वर उपरे, पंकज पाचपुते यावेळी उपस्थित होते.



