Breaking
ई-पेपरकवितापरभणीसाहित्यगंध

अवदसा

मायादेवी गायकवाड ठोकळ

0 4 8 2 9 0

अवदसा

अफाट,वाढली लोकसंख्या
खेडेगावे पडली ओस,
लोंढेच्या लोंढे,जाती शहरात
वांज झाली,गावांची कूस…!!१!!

तिथं,डोक्यावर छत मिळेना
रहायला झोपडी मिळेना,
शोधूनही हाताला कामं मिळेना
कणअन्नाचा, पोटाला मिळेना…!!२!!

सुखाची झोप उडाली
भरले कुटुंब उघड्या वर आली,
जमीन जुमला तो हीं, विकला
अशी कशी?मला अवदसा सुचली..!!३!!

रात्रपाळी, दिवस पाळी करून
आगगाडीच्या तालावर धावायंच,
मरण झाले,स्वस्त प्रवास करताना
धक्काबुक्कीत पडून मरायचं…!!४!!

मुंबई पुण्याच्या नादापाई
नको गमवू,गड्या अनमोल देह,
जप आपलं गाव,आपली माणसं
सुखादुःखाला, धावेल समूह..!!५!!

मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत,जि.परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे