0
4
8
2
9
0
सप्तरंगी दुनिया
या सप्तरंगी दुनियेत
निपजली रत्ने थोर
अण्णाभाऊ हिरा अनमोल
बनला तारा आकाशातील॥
सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण
वेदना माणसाच्या मांडून
वाटेगाव खेडयात जन्मून
पुतळा रशियात विराजमान ॥
शिक्षण दीड दिवस घेतलं
प्रतिभावान मन संवेदनशील
जनसामान्य केंद्रबिंदू ठेवून
समृद्ध मराठी साहित्य दालन ॥
विषमता दारिद्रय जातीभेद
पराकोटीचा गरीब श्रीमंत भेद
श्रमिकांचे देखिले हाल हाल
अण्णाभाऊ झाले बेजार ॥
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
वा असो गोवामुक्ती संग्राम
लेखणीने चैतन्य ओतून
यश लाभले मोठे योगदान ॥
पोवाडा शिवबाचा गाऊन
थोरवी रशीयात पोहचवून
तमाशाला वग गवळण
मराठीस दिला बहुमान ॥
जरी थोर साहित्य सम्राट
मानवता जागविली साहित्यात
नाही भूलला सप्तरंगी दुनियेत
चमकणारा तारा अखंडीत ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
========
0
4
8
2
9
0



