Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘ज्योतिर्विदांनी समाजाला जीवनात शाश्वत आनंदाविषयी समुपदेशन करावे’; डाॅ.मधुसूदन घाणेकर

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

‘ज्योतिर्विदांनी समाजाला जीवनात शाश्वत आनंदाविषयी समुपदेशन करावे’; डाॅ.मधुसूदन घाणेकर

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: (दि 28 जून): समाज आपल्या उत्कर्षासाठी वाटचाल करीत असताना अनेक चढउतार येत असतात.अशा प्रसंगी ज्योतिषांनी समाजाशी सुसंवाद साधून त्यांना जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी समुपदेशन करावे ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे ज्योतिर्विद आणि हस्ताक्षर मनोविश्लेषण तज्ञ विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. महिला ज्योतिर्विद संस्थेचे 100 वे अधिवेशन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.याप्रसंगी ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

धर्म आणि अधर्मातील युध्द, ट्रोल प्रकार, कंपुशाही, ढासळती नीतिमुल्य, आतंकवाद ,विविध क्षेत्रातील बाजारीकरण अशा प्रतिकुलतेविषयी ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करुन ज्योतिर्विदांनी समाजाला मार्गदर्शन करुन विश्वशांतिच्या कार्यास हातभार लावावा असेही डाॅ.घाणेकर पुढे म्हणाले.अधिवेशनाचे उदघाटन प्रसिध्द ज्योतिर्विद आदिनाथ साळवी यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी रमलतज्ञ चंद्रकांत शेवाळे तसेच श्रीपाद मुळे, मंगेश महाडिक आणि संदीप मुळे यांचीही भाषणे झाली.विद्यमान अध्यक्ष डाॅ.संजिवनी मुळे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.स्मिता गिरी यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ.रजनी साबदे आणि डाॅ.सविता महाडिक यांनी अतिथीचे स्वागत केले. ॲड सुनिता पागे यांनी संयोजन केले. सदर 100 व्या महिला ज्योतिर्विद अधिवेशनाचे औचित्य साधून संस्थेच्या लोगोचे आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाच्या 800व्या विश्वविक्रमी विशेषांकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.

सर्व मान्यवर आणि महिला ज्योतिर्विदच्या पदाधिकारी डाॅ.मुळे, प्रा.गिरी,डाॅ.साबदे, डाॅ.महाडिक, ॲड.पागे यांना महिला ज्योतिर्विद शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ॲड.मालती शर्मा, डाॅ.जयश्री बेलसरे, नीलम पोतदार, आभा करंदीकर,आरती घाटपांडे, डाॅ.सविता महाडिक आदिंनी युध्दजन्य परिस्थितीचे ग्रहमान, राहु-गुरू-शनिचे ग्रहांचे फलित, गोचर ग्रहांचे भ्रमण या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

समारोपात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी संपूर्ण अधिवेशनाचा आढावा घेतले. ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार यांच्या शुभहस्ते निबंध स्पर्धेचा बक्षिस समारंभ झाला.समाज उन्नतीसाठी ज्योतिष शास्त्राची गरज आहे , असे प्रतिपादन नंदकिशोर जकातदार यांनी केले. डाॅ.रजनी साबदे यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी पं.विजय जकातदार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे