0
4
8
2
9
3
मैत्रीचा गाव
आठवात आज दाटला
बालपणीचा हा भाव
हृदयकुपीत सजला
सुंदर मैत्रीचा गाव
झुळझुळ वाहणारा
असे निर्मळ झरा
ना कसली आकस
या हृदयप्रेमामृतधारा
सुंदर मैत्रीचा हा गाव
इथे नाही कसला दुजाभाव
सुंदर निरागसता ही
घेई मनामनाचा ठाव
मैत्रीच्या या गावात
मिळे विश्वासाचा हात
प्रेमाची रुजवण येथे
अनमोल आधाराची साथ
बंध जुळलेले मनामनात
काळजात रुजलेले भाव
मन ओथंबून हे आले …
आज मैत्रीच्या आठवात
जगाच्या गर्द रहाट प्रवाहात ..
आताशा मैत्रीचा गाव ओसाड
पण आज फुटली पालवी त्याला ..
पुन्हा सजला हा वास्तवात.
तारका रुखमोडे
अर्जुनी जि.गोंदिया
0
4
8
2
9
3



