Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

माझी पाककला: चटपटीत वडे

वसुधा नाईक धनकवडी, जि.पुणे

0 4 8 2 9 0

माझी पाककला: चटपटीत वडे

साहित्य: दोन वाटी तांदूळ, चार मध्यम आकाराचे बटाटे, हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे, लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ, थोडेसे जिरे आणि तीळ.

कृती : तांदूळ एक तास पाण्यात भिजत ठेवावेत. बटाटे मस्त मऊ उकडून घ्यावेत. तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटावेत. त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. मिरची, आलं, लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. पिठात मिक्स करून घ्यावे. मीठ स्वादानुसार टाकावे. तीळ,जिरं घालावेत. कोथिंबीर बारीक चिरून पेरावी, सर्व साहित्य मस्त एकजीव करून घ्यावे. गरम तेलात मंद आचेवरती छान छोटे छोटे वडे (भज्यासारखे) तळावेत. इडलीसाठी करतो त्या चटणीबरोबर, टोमॅटो सॉस बरोबर गरम, गरम वडे खायला द्यावेत.

वसुधा नाईक
धनकवडी, जि.पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे