0
4
8
2
8
4
प्रारब्ध
विज्ञानाच्या या युगात
प्रारब्ध..प्रारब्ध काय करता
थोतांड कल्पनांच्या नादाने
मनात चिंता करूनच मरता
प्रारब्धाचाच खेळ म्हणून
हातावर हात ठेऊन बसता
पूर्वजन्मीच्या पापाचे भोग
समजून इतरांना का हसता
प्रारब्धापेक्षाही विश्वास खरा
ठेवावा आपल्या कर्मावर
चांगल्या कर्माच्या फळासाठी
चालावे मानवता धर्मावर
वादळांनाही थोपविण्याची
हिंमत असावी लागते मनी
प्रकाशवाटा शोधणारा सदा
बनत असतो सन्मानाचा धनी
माणूस घडावा शिक्षणातून
क्रांती करावी चिंतनातून
प्रारब्ध हा खेळच मनाचा
सदुपयोग करा कष्टाच्या धनाचा
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========
0
4
8
2
8
4



