0
4
8
2
9
3
दूरदृष्टी
दूरदृष्टी ठेवूनच सदा
करावे खर्चाचे नियोजन
तरतेद भविष्यासाठी
नित ठेवावी जपून
कोणती वेळ कशी येईल
सांगता येत नाही कधी
अशा वेळेस जमा पूंजी
महत्वाची ठरते आधी
शिक्षण,आजारपण
येती अनपेक्षित कार्य
काटकसरीने करणे बचत
यासाठी आहे अनिवार्य
भूक नसो पण शिदोरी असो
अशी सदा ठेवून भावना
गाठचा पैसा कधीही
येईल कामी पुढे जीवना
दुरदृष्टी असणे जीवनात
गरजेचा आहे भाग
होत नाही वेळेवर धावपळ
सुनियोजित होते काज
श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे
साईनगर,अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
9
3



