आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
अज्ञानावर रुसू
भुमेश्वरी सातपुते खोंडे उमरेड, जि.नागपूर
0
4
8
2
9
3
अज्ञानावर रुसू
ज्ञानाचे रे पाईक आम्ही देशासाठी कसू,
रुसू अज्ञानावर रुसू !!धृ!!
परंपरेचे बंद फोडूनी,
अंधश्रद्धेचे पाश तोडूनी.
विज्ञानाच्या शिखरावरती
खुशाल जाऊनी बसू …
ज्ञानाचे रे पाईक आम्ही देशासाठी.. !!१!!
जात पात हा धर्म ना अपुला,
समानतेचा वसा बाणला
प्रगतीचे हे पंख लावूनी चंद्रावरती वसू …..
ज्ञानाचे रे पाईक आम्ही …!!२!!
कुणी अमीर ना गरीब येथे
सर्व समान या भारत माते
सुजलाम सुफलाम भूमाता
ही कष्टाने तव कसू … !!३!!
ज्ञानाचे रे पाईक आम्ही
देशासाठी कसू अज्ञानावर रुसू
भुमेश्वरी सातपुते खोंडे
उमरेड, जि.नागपूर
=======
0
4
8
2
9
3



