कन्नड तालुक्यात रंगले प्रथम ग्रामीण कवी संमेलन
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच छ.संभाजी नगरतर्फे आयोजित
कन्नड तालुक्यात रंगले प्रथम ग्रामीण कवी संमेलन
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच छ.संभाजी नगरतर्फे आयोजित
पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर/बनशेंद्रा (दि.८) (प्रतिनिधी): कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित प्रथम ग्रामीण कविसंमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणू्न आमदार संजनाताई जाधव (कन्नड, सोयगाव मतदार संघ), ॲड.विनोद गोल्हार (डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सागर जाधव (सचिव जि. शि.प्र. मं.) यांनी भूषविले.
या कविसंमेलनात तब्बल 38 कवींनी आपापल्या एकापेक्षा एक सरस काव्य सादरीकरण केले. त्यात बनशेंद्रा गावातील बारा बालकवी कवयित्री यांनीही रचना सादर केल्या. कार्यक्रमासाठी निमंत्रित कवींत जयश्री आहेर, प्रमिला कुलकर्णी, पायल बोडखे, रोहित सूर्यवंशी, श्रीराम दापके, संदीप वाकडे, पद्माकर वाघरूळकर इ. यांच्यासमवेत अनेक कवींचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तर समारोप राज्यगीताने करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा समितीतील सर्वच पदाधिकारी तसेच समाजातील प्रतिष्ठित दोन व्यक्तिमत्त्वांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. त्यात सागर जाधव (शिक्षण संस्थाचालक) आणि ॲड. विनोद गोल्हार (जिल्हा व उच्च न्यायालय वकील), ऋषीकेश आव्हाळे (युवा कवी/युवा प्रतिनिधी), पूजा चव्हाण (जिल्हा युवा प्रतिनिधी), रेणुका गोल्हार (उत्कृष्ट सूत्रसंचालक), गिरिजा भुमरे (उत्कृष्ट उपक्रमप्रमुख), पद्माकर वाघरूळकर (आदर्श पदाधिकारी) अशा पुरस्कारार्थींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन ऋषीकेश आव्हाळे (जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर भा.सा.व सं.म)
पूजा चव्हाण (जिल्हा संघटक), संपूर्ण गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्य बनशेंद्रा यांनी केले. कार्यक्रमाचे खुमासदार व लक्षवेधी सूत्रसंचालन रेणुका गोल्हार (जिल्हा कार्याध्यक्षा) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश आव्हाळे यांनी तर आभार प्रदर्शन पूजा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास दै. लोकमतचे पत्रकार प्रवीण जंजाळ यांचीही उपस्थिती होती.



