Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरसाहित्यगंध

योगायोग

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 8 7

योगायोग

घडणे बिघडणे सर्वस्वी
आपल्याच हाती असते
कोणाचीही साथ संगत
केवळ योगायोगच ठरते… //

कर्दमी उगवूनही कमळ
स्वतःचे पावित्र्य जपते
लांडोरांच्या मेळ्यातूनही
ना मोराचे अस्तित्व लपते… //

कावळ्याच्या घरट्यातच
कोकिळ जरी जन्म घेते
काव काव कधी न करता
कुहू कुहू अशीच ताण देते… //

पांढरा शुभ्र असला तरी
बगळा हंस होत नसतो
गरूड गगन कवेत घेतो
घुबडांचा घुत्कारच असतो… //

अनपेक्षित योगायोगाने
असंगाशीही गाठ पडते
त्याच्यासह वाहवत गेलो
तरच मात्र विपरीत घडते… //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे