आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
छत्रपती शिवाजी महाराज
कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0
4
8
2
9
7
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
जन्मले शिवनेरी किल्ल्यावरी
माता जिजाऊच्या पोटी
सह्याद्रीच्या निसर्गरम्यकडेकपारी
स्वराज्याचे स्वप्न पाहिले
सत्यात उतरले शिवबांनी
शक्तीबुद्धी युक्तीचा वापर
सिंह गर्जना रणांगणी
जाणता राजा शिवाजी
शत्रु घाबरले त्याच्या गर्जनेला
अग्निपरीक्षा दिल्या असंख्य
महाराष्ट्र मातीत कार्याने उजळला
- हर हर महादेव शिवशंभूची
गर्जते तलवार रायगडावर
दणाणून गेली धरती
हादरून टाकले दरबार
मातृभूमीचा आहे अभिमान
जनतेला आधार शिवबांचा
जिजाऊच्या आशीर्वादानेच
धैर्याण झाले रक्षक स्वराज्याचा
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
9
7



