0
4
8
2
9
4
नयणबाण
नयणबाण नजरेचा
घायाळ करुन गेला
विव्हळतो आजही
जखम काळजाला
कोण जाणे कशी ही
भूरळ पडली मनाला
पाहताक्षणीच सखये
भिडलीस गं ह्रदयाला
स्मितहास्य तुझे प्रिये
खुलते गालावर खळी
देऊन मजला होकार
भेटशील का सांजवेळी
किती करशील बहाणे
घेशील किती आढेवेढे
लाली गुलाबी ओठांची
गोडी चाखावया दे गडे
सोड प्रितीचा नयणबाण
आरपार जाऊ दे ह्रदयात
मार फुंकर नाजूक ओठांनी
जखम भरेल बघ क्षणात
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
4



