0
4
8
2
9
3
अडधडा
पाहता पाहता बाई
अवघा मिरुग सरला
पण आभाळाला नाही
जराही पाझर फुटला
सोसावेना धरणीला
असह्य विरह कळा
माया ममतेचं नातं
आला धावत अडधडा
आखीव रेखीव थेंबाचा
तो झरला पानोपानी
वाऱ्याच्या झोतात दिसे
सर नाजूक देखणी
मिळता पर्जन्याचं दान
सुखावला बळीराजा
तृष्णार्थ धरणीची ही
चिंब भिजली काया
झिम्मा फुगडी खेळीत
आला पाऊस वारा
धरा हसली गालात
पाहुनीया प्रियकरा.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जि चंद्रपूर
=======
0
4
8
2
9
3



