Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

सोपं नसतं बायको असून, नवर्‍याची आई होणं

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 4 8 3 0 0

सोपं नसतं बायको असून, नवर्‍याची आई होणं

सोपं नसतं बायको बनून कुणाच्यातरी आयुष्यात जाणं ..
बालपणातील आठवणींना स्वतःच्या हाताने लोटून देणं ..

नवर्‍याला यायला उशीर होतो तेव्हा जीव कातर होणं ..
स्वयंपाक घर ते दार सारखसारखं डोकाऊन पाहणं ..
मनातल्या मनात वाईट घेऊन देवघरात धावत जाणं ..

नवरा दारात दिसताच, जीवात जीव येणं ..
आईच्या मायेनं चेहर्‍यावरचे भाव ओळखून घेणं ..
आणि तो जेवल्यावरच आपण तृप्तीचा ढेकर देणं ..
सोपं नसतं बायको असून नवर्‍याची आई होणं …

सोपं नसतं ठेच लागेल तेव्हा त्याला साथ देणं ..
त्याची सारी संकट स्वतःहून अंगावर घेणं ..
न सांगता त्याच गणगोत आपलं करून घेणं ..
त्याच्या जबाबदार्‍या आपणहून आपल्या शिरी घेणं ..
सोपं नसतं बायको असून बहिणीच्या मायेनं समजून घेणं ..

सोपं नसतं हसत खेळत
प्रत्येक अडचणींना सामोरं जाणं ..
मागच सोडून पुढे चांगलच घडेल याची वाट पाहण ं..
आपला धीर सुटत असताना, त्याला मात्र धीर देणं ..
सोपं नसतं बायको असून मैत्रीच्या नात्यानं समजून घेणं ..

सोपं नसतं …
नको त्या शिव्या अन नको ते शब्द ऐकणं ..
नको असतं ते रूद्राचं तांडव अन ते बेभान होणं ..
नको असतो तो तमाशा आणि नको वाटतं ते जीण ..
सोपं नसतं त्याचा रूद्रावतार तोलून धरणाऱ्या
सखीच्या नात्यानं पार्वती होणं ..

सोपं नसतं रक्ताची माणसं विसरून जाणं ..
सोपं नसतं नवी नाती निर्माण करणं ..
सोपं नसतं एका माणसापायी
अख्खं कुटुंब एकमेकांशी जोडणं ..
स्वतःच्या मान मर्यादा स्वत्व
आशा अपेक्षांना विसरून जाणं ..
सोपं नसतं बायको असून नवरी होते हे विसरून जाणं…

सोपं नसतं आपला त्रास बाजूला ठेवून
अखंड त्याला बळ देणं मला बाहेर कितीही झालं तरी ती मला समाजावून सांगत असते आपल्या नशिबात जे तेच होणार आहे.घाबरण्याचे काही ही कारणं नाही.आणि वाईट सुध्दा वाटून घेयाचे नाही.
एवढ करून सुध्दा आपण मात्र दूर राहणं ..
त्याला राज्यपद देऊन आपण
त्याची राणी नव्हे दासीच होणं ..
सोपं नसतं बायको म्हणून आयुष्यात येणं
अन बायको राहून निभावून नेणं.

आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मानतो. कारण, देवाने आपली भेट घडवली आणि तुला माझ्या सहवासात गिफ्ट म्हणून देवाने तुला मला दिले.असेच एकमेकांची साथ आणि प्रेम आपले कायम राहो हीच देवाजवळ आणि सद्गुरु उज्वलानंद महाराजांच्या, सद्गुरू गहिनीनाथ महाराजांच्या, सद्गुरू गुरु बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. प्रेम म्हणजे फक्त गिफ्ट, कॅंडललाइट डिनर आणि गुलाबाची फुले नाहीत. प्रेम म्हणजे रोज एकमेकांसोबत जगणं, एकमेकांशी बोलणं, एकमेकांना वेळ देणं, खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं. जे आपण दोघांनी निभावले, असेच जीवन असेपर्यंत जगण्यासाठी ईश्वरानी बुध्दी द्यावे, आमच्या हातून चांगलीच कामे व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे