Breaking
ई-पेपरकविताखानदेशदेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

हवालदिल

संध्या मनोज पाटील

0 4 8 2 9 0

हवालदिल

हवालदिल..
माझं अस जीणं..
काय समजावे मी तुझं
मला सोडून निघून जाणं..
तुझ्या अशा मनमर्जीची
मी किती शिक्षा भोगणार..
विरहाच्या कारावासातच..
अजून मी किती जगणार..
अर्ध्या आयुष्यापुरताच..
होता का हा सहवास तुझा..
कसा गाफील राहिला ना..?
तुझ्यावरील विश्वास माझा..
किती बिनधास्त होतीस तू..
काळजी मात्र घेतली माझीच..
चुकून कुठली तक्रार केलीच..
तर’तुलाच हौस’म्हणत दुर्लक्षित..
प्रत्येकाच्या हृदयस्थानी..
तुझ्याच मायेची वसली मूर्ती..
सकाळी तुझ्या हातचा चहाचा.
दरवळच देई घराला स्फूर्ती..
नेहमी बघतो देव्हाऱ्यातही..
रुक्मिणी शिवाय विठोबा नसतो..
भिंतीवरच्या फोटोत तुला..
मी एकटाच का बघत बसतो..
आज हा विठ्ठल झाला असा..
नशिबाने इतका हवालदिल..
तूच त्या देवापाशी आता
तक्रार माझी ग पोहचवशील..
काळाने अमानुष घाव घातले..
तुला अचानक हिरावून घेतले..
तुझ्या बहुमोल श्वासांची ती किंमत..
आता गुदमरताना मला कळतेय..
चुकलेच तुला गृहीत धरणं..
तुझ्याच दिशेने पाऊल माझंही वळतेय..
मृत्यूच्या प्रतीक्षेत शरीर जगतंय..
मन मात्र तुझ्यासाठीच झुरतंय..
मन मात्र तुझ्याचसाठी झुरतंय..!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे