कवितानागपूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
शब्द सारे संपले आता; बळवंत डावकरे
0
4
8
2
9
3
शब्द सारे संपले आता
शब्द सारे संपले आता
लेखणीने मौन धरीयले
भेदक प्रसंग पाहुनिया
हात आपसुक थरथरले
लाडकी असे आईबापाची
सगुण संस्काराची ती खाण
लेक वाचवून शिकवली लेक
विकसित भारताचे अभियान
वैद्यकशास्त्र धारण करून
वसा चालवते रुग्णसेवेचा
रंजले गांजले हे रोगीजीव
झरा पाहती माणुसकीचा
टपून बसली गिधाडे येथे
नजर विखारी दुष्टदुर्जनांची
पेटले हे वासनांध नराधम
कुस्करली कळी फांदीवरची
धाक नसे कोणास ना ईथे
वांझोट्याच या कायद्याचा
केला भरदरबारी शिवबांनी
चौरंग रांझ्याच्या पाटलाचा
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
3



