0
4
8
2
9
0
शिववंदना
‘शि’लाचे रक्षण करण्यात सदाअग्रेसर
‘वा’दळे झेलण्यास ही नेहमीच तत्पर
‘जी’वन वाहिले ज्यांनी स्वराज्यासाठी
‘म’नी नाही धरिली आस सिंहासनाची
‘हा’र न मानता केले वार शत्रूवरी
‘रा’ खले इमान ज्यांनी प्राणापरी
‘ज’रासाही नाही ढळू दिला विश्वास प्रजेचा
‘की’र्तीचा झेंडा रोवून ठेवला कायमचा
‘ज’यजयकार होत राहील असाच रयतेच्या राजाचा
‘य’ दा यदा ही धर्मरक्षक तो या स्वराज्याचा…!
जय भवानी जय शिवाजी..
अनिता व्यवहारे
जि अहिल्यानगर
0
4
8
2
9
0



