Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आ. महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘साहित्यविश्व’च्या सोळाव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

आ. महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘साहित्यविश्व’च्या सोळाव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग(दि २०): साहित्यविश्व दिवाळी अंक २०२५च्या १६ व्या अंकाचे प्रकाशन लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत राही गार्डन कुरूळ येथे अतिशय निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाले.
व्यासपीठावरुन बोलताना साहित्यविश्व दिवाळी अंक सामाजिक विषयांवर भर देत , वाचनसंस्कृती जपत असल्याचे म्हटले.

सदर अंकातील कायदा व सुव्यवस्था या विषयाचे भरभरून कौतुक करुन, दिवाळी अंकाच्या माध्यमातून नकळतपणे कायदेविषयक जनजागृती करणाऱ्या संपादक प्रमिला जोशी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. ही परंपरा कायम सुरु ठेवण्यासाठी संपादक यांची मेहनत आणि खर्चाचा विचार करता, वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपली भूमिका मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले . पुढे बोलताना रेवस ,करंजा , साळाव पूल, सांबरकुंड धरण तसेच मतदारसंघातील इतर अनेक सुधारणांसदर्भातील बाबींचा उहापोह केला. अलिबागचा विकास प्रचंड वेगाने होत असून, येथील स्थानिक भूमीपुत्रांनी आपली वडिलोपार्जित शेती जतन करण्याचेही कळकळीचे आवाहन केले.

यावेळी साहित्यिक तथा कुरुळ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुजाता पाटील, साहित्यिक आणि फौजदारी वकील ॲड विलास नाईक, सुप्रसिद्ध गझलकार तथा माजी सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी वाचनसंस्कृती रुजवण्यासह सदर दिवाळी अंकातील सर्वच लेख अतिशय वाचनीय असून ,ते संग्रही ठेवण्याचे आवाहन केले. या दिमाखदार सोहळ्याला क्षात्रैक्य समाज संस्था अलिबागचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, नामांकित वकील ॲड प्रसाद पाटील, साहित्यिक तथा रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणेचे डेप्युटी जनरल मॅनेजर रमेश धनावडे, साहित्यविश्वच्या संपादक प्रमिला जोशी,ॲड प्रवीण ठाकूर, शिक्षणचे केंद्रप्रमुख महेश कवळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, व्यवस्थापक धीरज जोशी, श्रीमती कल्पना पाटील, ॲड कविता ठाकूर, ॲड वैशाली बंगेरा, गायक रोहित पाटील, श्याम जोगळेकर, जय जोशी, कवयित्री ॲड जीविता पाटील यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन महेश कवळे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश धनावडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे