परिश्रम आणि आत्मविश्वास
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
परिश्रम आणि आत्मविश्वास
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
एक सामान्य कुटुंबातील मुलगा…
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. जीवनाच्या संघर्षांमुळे पोटासाठी घर सोडून मुंबईची वाट धरली. भाऊजींच्या म्हणजेच कै. शांताराम महादेव चेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ए.सी. रिपेअरिंगचे शिक्षण घेतले आणि या क्षेत्रातील सखोल ज्ञान आत्मसात केले.
स्वतःच्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर अलिबागला परत येत, श्री पुरुषोत्तम प्रभू यांच्या मोलाच्या सहकार्याने स्वतःचे वर्कशॉप सुरू केले. Refrigeration Services क्षेत्रात सातत्यपूर्ण कष्ट, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या सर्व प्रवासात श्री महेश कर्णिक, मकरंद कर्णिक आणि सतीश प्रधान यांचे सहकार्य लाभले.
निरंतर प्रगतीचा ध्यास आणि कष्टाची तयारी यामुळे आज Sunil Refrigeration Services मार्फत अलिबाग व आजूबाजूचा संपूर्ण परिसर “कूल” ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत. त्यांनी लावलेल्या या परिश्रमांच्या रोपट्याला आज ३४ वर्षे पूर्ण होऊन ३५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. एक सामान्य व्यक्ती जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी उद्योजक कसा घडू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनिल तांबडकर. त्यांच्या कर्तृत्ववान, प्रेरणादायी प्रवासाला मानाचा मुजरा. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावीत, हीच सदिच्छा. संपूर्ण आगरी समाज संस्था परिवार व हितचिंतकांकडून मनःपूर्वक शुभेच्छा



