0
4
8
2
8
6
अभंग
ज्ञानदेवे भक्ती, सागर उसळे |
म्हणती सगळे, पांडुरंग ||१ ||
तुका म्हणे मना, नको नाम दोष |
अवघाचि रोष, पांडुरंग ||२||
एकनाथ नामा, वाढे दिव्य शोभा |
देखिलीया प्रभा, पांडुरंग || ३||
सावता माळी हा , जमीनीच्या ठायी |
पुजतो विठाई, पांडुरंग || ४||
जना पुंडलिके , पाहिली वैखरी |
अवघी पंढरी, पांडुरंग ||५||
विठ्ठल विठ्ठल, मुखे उच्चारुण |
म्हणतो किरण, पांडुरंग ||६||
किरण कमलाकर देशमुख,
चंद्रपूर.
0
4
8
2
8
6



