“आभारीय शब्दसुमने”; मृदुला कांबळे
मनी आनंदी आनंद गडे..'

“आभारीय शब्दसुमने”; मृदुला कांबळे
‘मनी आनंदी आनंद गडे..’
रम्य सकाळ बोचरी थंडी
पांघरून आली धुक्याची चादर.
तुमचा फोटो पाठवा ह्या संदेशाने
मनाला आला आनंद बहर…
सकाळी दादांचा जादुई संदेश आला आणि मग थोड्याच वेळात समूहात पोस्टर देखील. मी ते बघितलं आणि माझी स्थिती म्हणजे साधं पास होण्याची ही अपेक्षा नसलेला विद्यार्थी निकाल बघतो आणि त्याला त्याचं नाव यादीत प्रथम क्रमांकावर दिसतं तेव्हा त्याची जशी स्थिती होईल. अगदी तशीच स्थिती बालकविता समूहात पोस्टर बघताना माझी झाली होती.
बालकाव्याचे पोस्टर पाहून
मनी आनंदी आनंद गडे..
सुंदर, नाजूक, मोहक पक्षी
किलबिल करती चोहीकडे.
‘बालकाव्य’ लेखन हे अत्याधिक अवघड प्रकार आहे. कारण बाल भावविश्वच खूप वेगळे असते. मस्ती मजा,अल्लडपणा, निरागस मन आणि त्यात त्यांची जिज्ञासू वृत्ती जी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अपितु खोड्या, तोडातोडी अन् पुन्हा ते जोडाजोडी करण्यास निरंतर प्रवृत करतं असते ते बालमन.
काल ‘किलबिल’ हा विषय पाहिला आणि बऱ्याच प्रकारे रचना लिहिण्याचा प्रयत्न केला .अगदी त्यासाठी मी दोन, तीन रचना लिहून पाहिल्या. पण त्या कवितेशी काही माझे सूर जुळतं नव्हते. मग अचानक मला माझ्या गॅलरीत रोज पोळी, तांदूळाच्या कण्या अन् पाणी पिऊन भुर्रकन उडून जाणारे पक्षी आठवले. एखाद्या दिवशी जर मी त्याचं खाणं पाणी ठेवायला विसरले की मग सारेच कसे किलबिलाट करतात..ते आठवलं आणि मग डोक्यात बालकविताचं सुंदर चित्र रेखाटलं गेलं.
बालकवितेत आमची शहाणी राणी
किलबिल पक्ष्यांना देते दाणा पाणी.
आणि आश्चर्य की माझी बालकविता आ.राहुल दादा आणि आ.परीक्षकांना पसंत पडली. बालकविता समूहात सर्वोत्कृष्ट पोस्टर रूपात झळकली. मला ह्या समूहाचा मार्ग दाखवणारे, आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेचे सक्षमीकरणासाठी हा समूह स्थापित करून त्याचा प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट उपसणारे समूहाचे आधार स्तंभ ,
आम्हां सर्व शिलेदारांच्या मनात मराठीची अवीट गोडी निर्माण करणारे. अर्थात आमचे राहुल दादा. आज मी जे लिहू शकते
किंवा पुढे ही मी जे काही लेखन करेन. ते माझ्या एकटीचे यश नसून माझ्या सर्व शिलेदार समूहाचे असेल. मी मराठीचे शिलेदार समुहाचा एक भाग आहे. याचा मला खूप खूप अभिमान आहे.
“किलबिल’ ह्या माझ्या बालकवितेला सर्वोत्कृष्ट स्थानवर विराजमान करण्यात आले. त्याबद्दल समुहाचे सर्वेसर्वा आ.राहुल दादा आ.पल्लवीताई,आ.सविताताई,
आ. वैशालीताई, आ. तारकाताई
आ.स्वातीताई, आ.वृंदाताई आ.शर्मिलाताई, आ.सुधाताई, आ.विष्णु दादा ,आ.संग्राम दादा आ.हंसराज दादा आणि प्रशासकीय टीमचे मन:पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. तसेच माझ्यावर अभिनंदन आणि आशीर्वादाचा वर्षाव करणारे माझे सर्व शिलेदार बंधू भगिनींचेही मन: पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.
कवयित्री मृदुला कांबळे
गोरेगाव जि रायगड
सदस्य मराठीचे शिलेदार समूह



