0
4
8
2
8
4
लाकूडतोड्या
सांग ना रे लाकूडतोड्या
तू झाडे का बरं तोडतोस
चिव चिव चिमणीचं तू
घरटं उगीच रे मोडतोस..
रोज झाडे तोडली तर
सावली कशी मिळणार
पाऊस नाही पडत मग
हे तुला कधी रे कळणार..
जांभूळ चिंचा बोरे आणि
आंबे सुद्धा मिळणार कशी
नको ना रे तोडू विनाकारण
कोणतेही झाड दरदिवशी..
झाडांची कत्तल करताना
हात कसे थरथरत नाही
ज्याच्यामुळे अन्न पाणी
त्यालाच तू मारत राही..
तोडू नको यापुढे झाड
एकतरी झाड तू लाव
होईल दुष्काळमुक्त नि
सुंदर आदर्श तुझे गाव..
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
8
2
8
4



