Breaking
दादरा नगर हवेलीनवी दिल्लीपरीक्षण लेखविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

मी पाहिलेला निश्चयाचा महामेरू

कार्यकारी संपादक: सविता पाटील ठाकरे

0 4 8 2 8 4

मी पाहिलेला निश्चयाचा महामेरू’; सविता पाटील ठाकरे

परिश्रमाला तोड नाही, जिद्दीला जोड नाही. कर्तुत्वाला सीमा नाही, नेतृत्वाला तोड नाही. असे पहाडासारखे खंबीर, अडचणींचे चटके सोसून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे, प्रभावी अभिवाचक मुलाखतकार, संपादक, अफाट जनसंपर्क असलेले, वेचक आणि वेधक दृष्टी असलेले, अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले, ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा व बलस्थान आदरणीय राहुल पाटील सर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ही शब्दसुमनांची ओंजळ.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या उक्तीला साजेसे असे राहुल सरांचे व्यक्तिमत्व आहे. सरांची सकाळच एका वेगळ्या दृष्टिकोनाचा शोध घेत सुरू होते. एकाच वेळी विविध क्षेत्रात हात अजमावत त्यात यशस्वी होऊन दाखवणे हे राहुल सरांनाच जमतं. कोणत्याही कामाची पद्धत कशी असावी हे सहजरित्या जाणण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे विचार, वाणी आणि कृतीमध्ये एकवाक्यता असते. एकाच वेळी विविध उपक्रम राबवत, त्यात यशस्वी होऊन दाखवणे ही खूप कमी लोकांना जमणारी बाब आहे. कोणतेही काम करताना कामाचे पूर्वनियोजन, शिस्तबद्धता, वेळेचे व्यवस्थापन या गोष्टींवर त्यांचा सातत्याने भर असतो.

मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कोणतीच कुंपणं कधीच अडवीत नाहीत. आणि स्वतःच्या व्यथाही ते गोंजारत बसत नाहीत. साहित्यिकांचा साहित्य निर्झर सतत वाढावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच असतात. चांगले साहित्य ही समृद्ध जीवनाची शिदोरी आहे हे ओळखून ज्ञानाचा, साहित्याचा अमर्याद खजिना राहुल सरांनी वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला आहे. अजून आपण चांगलं काय देऊ शकतो याच्या शोधातच असतात सर…! आणि मग सुर गवसला की त्यांना आस लागते ती साध्य करण्याची.

“यशाच्या क्षणात सरांचे ना जमिनीवरचे पाय सुटतात आणि संघर्षाच्या परिस्थितीत ना कधी धीर खचतो”. कितीही व कसेही प्रहार असोत, मग ते झेलण्याची क्षमता त्यांच्या ठायी आहे. ‘उपजतच नेतृत्वगुण असलेल्या सरांच्या निर्णयातून त्यांची कर्तबदारी सहज जाणवते’. खरंतर बळ देण्यातून आणि जबाबदारी सोपवण्यातून नेतृत्व घडत असतं आणि माझं नेतृत्व घडवण्याचं श्रेय जाते ते आदरणीय राहुल सरांना. सरांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली हे माझं अहोभाग्यच..! कोणत्याही कृतीमागे तार्किक विचार कसा हवा सरांकडूनच शिकले मी. कटूता न ठेवता आणि कटूता ठेवणारे वातावरण निर्माण होऊ न देता सर्वांना समान संधी देत, सोबत घेऊन चालणं हा सरांचा स्वभाव धर्म. वज्रासारखे कठोर असणारे राहुल सर प्रसंगी मेणाहूनही मऊ होतानाही मी पाहिलेय.

तसं पाहता… मी कार्यकारी संपादक आहे, तरी असता कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर माझ्याशी विचार विनिमय करतात माझं मत जाणून घेतात आणि त्यानंतरच पुढे जातात. यावरून त्यांची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी प्रवृत्ती आहे ती निश्चितपणे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाईल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वराकडे हीच प्रार्थना की, राहुल सरांना उदंड आयुष्य द्यावे त्यांच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभावे हीच सदिच्छा..!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
कार्यकारी संपादक ‘साहित्यगंध’
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे