नाते जीवाभावाचे
प्रत्येक माणूस असतो वेगळा
असते विचारसरणी आगळी
येती जन्मास प्रत्येक निराळा
मनुष्या तुझी कहाणीच वेगळी
बापासारखा मुलगा नसतो पहारे
आईसारखी नसते मुलगी सारखी
नवराबायकोचे कधी मतमतांतरे
जुळून पटतात का बघून पारखी
नातं जीव कोणतंही असू द्याच
मतभेद कितीही नात्यात असो
संबंध तोडण्याची भाषा कधीच
मुळीच कुणाच्या मनात द्वेष नसो
जरी आपापसात ऐकमेकांचे
कधीच विचार पटले नाही तरी
जीवनगाडी मात्र हाकायची असते
अबोलाधरू विभक्त व्हायचं नसते
राग मनात धरून ठेवला म्हणून
कधी कुणाचं भलं झालयं का?
बिन सुंगधी फुलांच्या झाडाजवळ
कधी पाखरू तरी भटकलयं का ?
समोरची व्यक्ती चुकली जरी
असं प्रेम करता आलं पाहिजे
झालं गेलं विसरू चला तरी
गच्च मिठी मारता आली पाहिजे
जाण येणं चालू ठेवल पाहिजे
आपलीचं माणस कसला रूसवा
समोरच्याला क्षमा करून देवाला
म्हणायचं “आनंदी ठेव त्याला “
नाते येतात संकटवेळी धावून
दुसरं तिसरं मोठ काही नाही
आपल माणूस आपल्याजवळ
यासारखी श्रीमंती कुठेच नाही
बघा आयुष्य खुप छोटे आहे
हां हां म्हणता संपून जाईल
प्रेम करायचं राहिलंय म्हणून
शेवटी खूप पश्चाताप होईल
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
==========



