0
4
8
3
0
0
वीण नात्याची
चाला पुन्हा एकदा नात्याचं वस्त्र विणूयात..
प्रत्येक नात्याचा एक एक धागा
माळेत गुंफूयात.
काही नाती प्रेमाची…
काही नाती आपुलकीची
काही नाती मायेची तर
काही नाती ममतेची विणूयात…
एक नातं परमेश्वरा शी पण आहे आपलं.
त्या परमेश्वरा ला मनात आठवून
चिंतन.. मनन…नामस्मरणाने सजवूया…
आयुष्यातला नात्यांना जपायला शिकाव
रेशमी मलमल भरजारी वस्त्र प्रमाणे
नाते पुन्हा नव्याने रिचार्ज करूयात…
व्यक्तित्व अन व्यक्तिमत्व पुन्हा नव्याने सुधारू यात..
मोबाईल च्या बाहुपशातून सुटकारा एकदाचा करून घेऊयात..
संवाद जरी चॅटिंग वर असले तरी
त्यात मायेचा ओलावा नसतो..
असतो तो दुरावा मनाचा
माणूस माणसाच्या जवळ जाण्याचा
पुन्हा एकदा inernet च्या विळख्यातून स्वतःला बाहेर काढूयात.वीण नात्याची नव्याने पुन्हा गुंफूयात…..
सचिन दत्ताराम माळी
माणगाव रायगड
===========
0
4
8
3
0
0



