शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील नागपूर
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*☄विषय : पात्र – अपात्र☄*
*🍂शनिवार : २०/ सप्टेंबर/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर्व विजेत्यांनी आजच अंक १८७ साठी साहित्य पाठवावे.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पात्र अपात्र*
सांगा कोणत्या मापदंडाने
ठरवताय पात्र…. अपात्र
प्रदीर्घ अध्यापन सेवेवरती
आता ठेवावे का तुळशीपत्र…?
कित्येक सनदी अधिकारी
याच जि प शाळेने घडवले
मात्र कोणत्या मास्तराने
सांगा घर सोन्याने मढवले..?
नेते, वकील, न्यायमूर्तीनी
जिथे पहिले धडे गिरवले
आज त्याच गुरूजनावरती
कायद्याचे हत्यार उगारले..?
ज्यांनी ज्ञान अमृत पाजले
त्यांना करावा नम्र सलाम
शाळाबाह्य कामे लादूनच
बनवले सरकारचे गुलाम…?
आहे का काही मोजदाद
किती वाढवता माथी भार
की मराठी जि. प. शाळाच
तुम्ही करणार का हद्दपार…?
हक्क,अधिकार,कर्तव्याची
झालीय नुसती सरमिसळ
दररोज नवे सरकारी आदेश
सक्तीचीच ना ढवळाढवळ..,?
आता संभ्रमात टाकणारा
टीईटी चा आला नवा नियम.
पात्र.. अपात्र ठरू की नाही
कशी राहील नोकरी कायम…?
बदली की स्वेच्छा निवृत्ती?
आता हाच तर प्रश्न पडलाय
सन्मानाने होण्यास सेवापूर्ती
हा टीईटी चा कायदा नडलाय..
असे अवघड जागेचे दुखणे
कुणी समजून घेईल की नाही
वेठीस बांधलेला जि प. शिक्षक
यातून मुक्त होईल की नाही..? //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र-अपात्र*
का खेळता जीवनाशी,
शिक्षकांचे बनूनी खुनी?
पात्र–अपात्र ठरविण्याचा
अधिकार दिला कुणी?
बघा ना, तुमची पात्रता —
धारण तुम्ही केलेली.
मगच ठरवा पात्रता
शिक्षकांनी धारण केलेली.
बघा भ्रष्टाचाराची तुम्ही
संपत्ती कमावलेली,
पाहा आयुष्याची कमाई
शिक्षकाकडे असलेली.
व्याधींनी त्रस्त आहेत,
मुलाबालास काम नाही.
मारण्याच्या योजना आणता,
काहीच कसे वाटत नाही.
काय करता अपात्र ठरवून,
मारून टाकता का त्यांना?
कुटुंब संपवले तर सांगा,
फेडाल पाप कुठे जाताना?
निवडून दिले तुम्हाला
जनतेच्या भल्यासाठी,
निघालात साप बनूनी
डंख माराया कुणासाठी?
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र… अपात्र*
शिक्षकांसाठी आली बघा
आता नवी टिईटी परिक्षा
झालोच नाही पास तर
गुंडाळावा लागेल गाशा ?
पात्र..अपात्र कसे ठरेल
संभ्रमात आता गुरूजी
अकरानंतरची भरती का
शासन नजरी बिनबुडाची?
पाच वर्षाचा देऊन अवधी
करा म्हणतोयं पास टिईटी
नाहीच झालोत पास तर,
घ्यावी लागेल स्वेच्छानिवृत्ती?
भितीचे आणीक संभ्रमाचे
वातावरण शिक्षकी गटात
वाढून ठेवला किती मनस्ताप
शिक्षक वर्गाच्या हो ताटात?
लवकर सुटावा तिढा हा
सुरळीत चालावी शिक्षणगाडी
तेव्हाच घडवतील शिक्षक
हसतमुखाने सुसंस्कारीत पिढी
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र- अपात्र*
विनामूल्य बदली होतेय
बदलीपात्र शिक्षकांची
पात्र-अपात्र निकष लावून
संवर्ग ठरवून दिलेल्याची
सोयीस्कर होण्या बदली
दिले संवर्ग ठरवून चार
सोयीनुसार मिळण्या गाव
करताहेत इथे ही लुटमार
दिव्यांगाची खोटी नाटी
पुरावे जमा करून सादर
खऱ्याची माय वनवासाला
खोट्याचा होतोय आदर
आले हे शासनाचे ध्यानी
करताहेत हे हुलकावणी
शहानिशा करण्या खरेखोटे
सुरु झालीय पडताळणी
कोण पात्र-अपात्र आहे
निदर्शनास जेंव्हा येईल
खोटे पुरावे दाखल केले
शिक्षा मात्र तया होर्ईल
भंबेरी उडाली आता मात्र
खोटे पुरावे दाखल केले
दोषींना कठोर शिक्षा ही
होते म्हणून घाबरून गेले
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पात्र _अपात्र*
शिक्षक म्हणून आता
अर्धी झाली नोकरी
आहे पात्र _अपात्रतेची
टांगती तलवार शिक्षकांवरी
आता द्यावे लागणार सर्वांना
टी इ टी शिक्षक पात्र परीक्षा
उत्तीर्ण होणे सर्वांना अनिवार्य
तर पुन्हा रुजूची अपेक्षा
पात्र _अपात्र ह्या दरी नुसार
आहे सर्वांना अडचण येणार
शिक्षक सेवेत कायम राहण्या
पात्र परीक्षा पास करावी लागणार
अपात्रांना उत्तीर्ण आहे गरजेचे
आज पर्यंत दिवस गेले मजेचे
जे नाही करणार उत्तीर्ण परीक्षा
त्यांनी विचार करावे परतीचे
५३ वर्षा पर्यंतच्या शिक्षकांना
आहे टी इ टी परीक्षेची शक्ती
तरच त्यांचा सुटणार प्रश्न
तेव्हाच त्यांना मिळणार मुक्ती
सर्व शिक्षकांमध्ये धास्ती
सोबत पसरलेली आहे भीती
त्यांच्या चेहऱ्यावरची उडाली हवा
आता नियम निघाला नवा नवा
५३ वर्षावरील शिक्षकांना
थोडी मिळाली आहे दिलासा
त्यांना नाही टी इ टी अनिवार्य
सेवेचा आहे विश्वासिक भरोसा
असा हा संभ्रम अजूनही
आहे त्यांच्या मनात घरकरून
अजून होणारतर नाही लूट
हे दाखवत नाही मनातून
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र अपात्र*
खास शिक्षणशास्त्र पदवी
गुरुजींनी संपादन हो केली
झाले शिष्यही राजकारणी
गुरुची विद्या गुरूला फळली…
बसून वातानुकूलीत खुर्चीत
गुरुजींशी केले सुरु नवे खेळ
शासन जी आर वाचायलाही
ऑनलाईन कामाने नाही वेळ…
राष्ट्रनिर्माते गुरुजी ठरणार का
टी ई टी परीक्षेनेच पात्र अपात्र
रोज निघणाऱ्या शासनपत्राची
पूर्तता करण्यात थकतात गात्र…
दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत
पात्र अपात्र परीक्षा लागू करा
ऊठ सुट गुरुजीवरच निशाणा
कुटनीती खेळ समजला सारा…
पात्र अपात्र नाटक कशाला? हो
अग्नितून गुरुजी जास्त उजळला
विश्वात अव्वल स्थानी तोच देश
ज्यांना कल्पवृक्ष गुरुजी कळला…
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र-अपात्र*
शिक्षक तोच खरा, जेव्हा ज्ञानाने उजळतो,
विद्यार्थ्यांच्या अंतरी, दीप नवा तो पेटवितो।
पात्रता केवळ कागदावर नसे मोजायची,
मानवी स्पर्श, करुणेनेच ओळख पटायची।
अपात्रतेच्या छायेत, जेव्हा शिक्षण थरथरते,
भविष्यातील पिढीचे स्वप्न मात्र तुटत जाते।
तेथे हवे शिक्षक अंतरी जागृत विवेकाचे,
जे करतील मार्गदर्शन जीवनमूल्यांचे।
पात्र गुरु तेच ठरती, जे आदर्श होऊन जगती,
वाट दाखवीत संस्कारांची, प्रत्येक पावलावरती।
शब्दांनी नव्हे, कृतींनी जे शिकवतात सत्य,
त्यांच्या चरणी विद्यार्थ्यांचे असते अखंड भक्त्य।
अपात्र गुरुंचा भार जेव्हा समाज उचलतो,
तेव्हा विचारतो अंतरात्मा — “हे कुठे नेईल?” असा।
उत्तरे मात्र सापडती पात्रतेच्या किरणात,
ज्ञान, निष्ठा, प्रामाणिकतेच्या अखंड प्रवाहात।
शिक्षक हा दीप, समाजाचा श्वास, संस्कृतीचा आधार,
तो जळतो स्वतः पण विद्यार्थ्यांना करतो उजळ पार।
म्हणुनीच निवडूया आपण तेच गुरु श्रेष्ठ,
ज्यांच्या हातून उमलतील उद्याचे भारतवर्ष।
*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र अपात्र*
सांग नोकरीत माझ्या कुठे सर्व अनुकूल होते
कधी सुगंध तर कधी कादंबरीतील सुकलेले फूल होते
पात्र अपात्र हे कसे अन ठरवायचे कोणी
ते पांघरूण तर वशिल्याची झूल होते
मातीचाच गोळा तो आला जेव्हा शाळेत
किती संस्काराने घडवले ते मूल होते
नाही ऐकविले रडगाणे कधी कुणापुढे
किती ते क्षण आम्हास जरी प्रतिकूल होते
पटसंख्या अन हजेरीपट सांभाळताना कितीदा तोल गेला
विद्यार्थी जमवण्यास किती ओलांडले पुल होते
*✍️मृद्गंध✍️*
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र अपात्र : -*
सामना लढतीत फार चूरस होती
स्पर्धा जिंकाची बसली कस होती
बसलो नियम अटीत निकषांच्या
निवडलेली मानांकने पास होती
पात्र अपात्र तुलना भेद गटबाजी
एकमेकांची करी मग हिरस होती
डावलले नाव कानमंत्र दिला गेला
अन्यायीषडयंत्रे रचली खास होती
प्रयत्नाशिवाय वाढले गूण कसे?
निदर्शनी आले टक्के बोगस होती
अहर्ततेची पडताळणी होईस्तवरी
स्थगिती आणलेली तुर्तास होती
पारदर्शकता निकालास आणली
सत्यता बाजू जमेची सरस होती
*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र -अपात्र*
केलेत कितीही जरी कष्ट,
उभ्या आयुष्यात अहोरात्र…
ते कष्ट ठरतेय कुणाच्या,
सोयीनुसार *पात्र -अपात्र*…१
आपुले हित जिथे साधते,
तयांना लोक मानती पात्र…
हित साधले जाई न जेव्हा,
तया ठरवितेय अपात्र…२
स्वार्थ हितार्थ रे चरितार्थ,
आपुल्या हिता ठरे मतार्थ…
जगणे मरणे स्वार्थासाठी,
मरुन जगती स्व: सन्मार्थ…३
ऐसी वृत्ती रक्तात वाहता,
क्षुल्लक ठरे वैचारिकता…
‘सुधाकरा’ जो तो पाळतोय,
स्वार्थास्तव औपचारिकता…४
*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर, जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



