Breaking
ई-पेपरनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

“यशोगाथीय शुभेच्छा”

सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर

0 4 8 2 8 4

*”यशोगाथीय शुभेच्छा”*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

*असता साहित्याच्या जगती,*
*कधीकाळी कुणी हो गाफील …*
*मार्गदर्शक…….. म्हणून येती,*
*लाडके तेचि….. राहुल पाटील…*

दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्या आतुरतेने वाट पाहत होतो,ती पहाट *दिनांक ०२ मार्च २०२५* ला उगवत आहे.मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर चे *मुख्य संपादक आदरणीय राहुलदादा पाटील* हे या दिवसाला साहित्यिक सूर्याची किरणे अष्टदिशांनी उधळतांना सर्वांना त्या किरणांत न्हाऊन निघण्याचा स्वानंद घेण्याचा अवसर प्राप्त करून देणार आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते *कवी वि.वा.शिरवाडकर* यांच्या जन्मदिनी पाळण्यात येणारा *”मराठी भाषा गौरव दिन”* याचे औचित्य साधून उर्वेला काँलनी, नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे निवडक सारस्वतांच्या प्रकाशित पुस्तकांवर *”साहित्यिक संवाद”* आणि *”कवी संमेलन”* यांचे आयोजन *मुख्य संपादक मा.राहुल पाटील…. मुख्य परिक्षक व प्रशासक मा.सविता पाटील ठाकरे… मुख्य आयोजक व जेष्ठ कवयित्री मा.सविता धमगाये* यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या अमृतमहोत्सवास हार्दिक शुभेच्छा…!
मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा…सहज प्राप्त झालेला नाही… त्यासाठी कैक वर्षानुवर्षे जीवाचे रान करावे लागले…आणि यापुढे तो दर्जा अबाधित ठेवण्यासाठी अनेकांमध्ये राहुल दादा हे ही प्रयत्नशील आहे….त्यांची तळमळ दर दिवसाला प्रत्ययाला येतचं असते.आपल्या मायमराठीला प्रबळ,सबळ, करतांना देशव्यापी नव्हे तर विश्वव्यापी करण्याचा चंग आपण सर्व मिळून बांधूया….!
या दिवसापूर्वी मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाचे, कथासंग्रहाचे,कांदबरीचे सामर्थ्य जनमानसांपर्यंत जाणिवेतून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधल्या जाणारा हा सुवर्णयोग वाखाणण्याजोगा निश्चितच आहे…या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या धडाडीच्या नेतृत्वाला मानाचा मुजरा….आणि साहित्यिक यांना साहित्यविश्र्वात रममाण होऊन जनहित जोपासना करण्याबाबत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना कोटी कोटी मनस्वी सहृदय शुभेच्छा….!

सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे