ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे ८२ व्या वर्षात पदार्पण
लेखक - सुनिल डबरे , बेलोशी
ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे ८२ व्या वर्षात पदार्पण
लेखक – सुनिल डबरे , बेलोशी
अलिबाग/रायगड: जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, “कुलाबावैभव ” संपादक , निव्रुत्त मुख्याध्यापक , सामाजिक कार्यकर्ते , रायगड भूषण श्री . बळवंत वालेकर (M.A. B. Ed,) आज (दि. १२ डिसेंबर रोजी ) ८ २ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत . त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कामांचा मागोवा .
पूर्वी खेडेगावात S, T, येणे दुरापास्त होते . रस्त्यांची दुरावस्था होती . शिवाय S, T. चे विभागीय कार्यालय ठाणे येथे होते . या सर्व अडचणींतून मार्ग काढीत , विभागीय कार्यालयात अनेक खेपा मारुन सन
१९६८ -६९ मध्ये पेण – वाघोली S, T. सुरू केली त्यामुळे वाघोली परिसरातील जनतेची सोय केली . ‘थळ खतप्रकल्पास’ पाणी पुरवठा होण् यासाठी M.I. D, C.ने नागोठणे – ते थळ जलवाहिनी व रस्ता तयार केला.सदर रस्त्याच्या पेझारी – जळपाडा मार्गे S, T. सुरू हौण्यासाठी M. I. D, C,च्या अँधैरी (मुंबई ) येथील प्रधान कार्यालयातून N. O, C. आणुन रेवस व मांडवा बंदराकडे S, T, बसेस १९९० साली चालू केल्या . प्रवाश्यांच्या प्रतिसादामुळे तुफान बसेल सुरू आहेत.
को. ए. सो या प्रथितयश शिक्षण संस्थेच्या सेवकांना बचतीची सवय लागावी तसेच संकटकाळात कर्ज उपलब्ध होण्यासाठी १९६९ – ७० मध्ये *को. ए. सो. सेवक सहकारी पतपेढी* स्थापन केली. सहकार खात्याची मान्यता मिळाल्यानंतर या पतपेढीचे प्रथम अध्यक्षपद बळवंत वालेकर यांनी भूषविले. ही पतपेढी अम्रुतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.
तीनविरा – वाघोली – वाघ्रण या सात कि. मी. लांबीच्या रस्त्यापैकी विरवाडी ते वाघ्रण हा दीड कि .मी. रस्ता खारटणातील होता . तेथे फक्त बांधावरून जाणारी पाऊलवाट होती . नाबार्ड या वित्तीय संस्थेकडून १९९४ – ९५ साली या रस्त्यासाठी २१लाख रुपये मंजूर झाले. पण P. W. D. कडून सदर रक्कम खर्ची फडत नव्हती . दै. लोकसत्तामध्ये बातमी पत्रे लिहूनही कागद हलत नव्हते. शेवटी जिल्हाधिकारी यांना उपोषणाची नोटीस दैताच कागदपत्रे हलू लागली . आणि ३१ मार्च २००० पूर्वी सदर रस्त्याचे खडीकरण व डाःबरीकरण होईल असे पत्र P. W, D. कडून बळवंत वालेकर यांना आले. व कार्यवाहीपण झाली . आज या रस्त्यावरून तुफान वाहतूक चालू आहे.
सागरगड -माची ही आदिवासीवाडी वन विभागात वसली असल्यामुळे रस्ता , वीज , पाणी इ. सुविधांना आदिवासी मुकले होते . त्यासाठी बळवंत वालेकर यांनी मोर्चे , निवेदने , उपोषणे इ. अस्त्रांचा वापर करीत २३वर्षे झगडले.जिल्हाधिकारी कार्यालय , मंत्रालय (मुंबई ) वन विभागाचे रराज्यस्तरीय कार्यालय नागपूर येथेही खेटे घातले. मुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले. शेवटी शासनाकडून १० एकर जमीन मिळविण्यात पत्रकार वालेकर यशस्वी झाले.म्हणून आदिवासींना रस्ता , वीज , पाणी इ. सुविधा मिळाल्या.
अधिस्विकृतिधारक पत्रकाराःना व्रुत्त संलनासाठी , S. T. प्ररशासनाकडून पूर्वी कूपन्स दिली जात . काही वाहक निमआराम S. T, साठी कूपन्स अवैध ठरवीत. हा अन्याय दूर होण्यासाठी वालेकर सर , यांनी S. T,चें विभागीय नियंत्रक यांना भेटूल लेखी तक्रार दिली. त्या त क्रारीवर उत्तर आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांचा दरवाजा ठोठावला.जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार व S T, प्रशासन यांना
म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्या नंतर अधिस्वीकृतिधारक पत्रका रास व्रु त्त संकलनासाठी कूपन्स निमआराम गाडीसाठीही वैध आहेत असा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला. या निकालामुळे महाराष्ट्रातील पात्र पत्रकाराःवर झालेला अन्याय दूर झाला . म्हणून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी वालेकर सरांचे अभिनंदन केले.
वाघोली परिसरात आरोग्य विषयक सुविधा नव्हत्या . त्याबाबत व्रुत्तपत्रामार्फत प्रकाशझोत टाकून कागद हलत नव्हते . शेवटी पत्रकार बळवंत वालेकर यांनी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील यांची भेट घेतली.व आदिवासींसह सर्वाना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी जि. प. चे आरोग्य उपकेंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना असणे गरजेचे आहे असे सांगितले . त्यामुळे लगतच्याकाळात वाघोली येथे प्राथमिक आरोग्य उपकेःद्र व पशुवैद्यकीय दवाखाना (प्रथम श्रेणी ) या सुविधा सुरू झाल्या. रायगड जिल्हा हा मुंबई महानगरीशी लगतचा जिल्हा असल्यामुळे अनेक जिल्हास्तरीय कार्यालये मुंबई व ठाणे येथे थाटली होती .
हा रायगडवर धडधडीत अन्याय होता . सामान्य जनतेची कामे अधिक गतीने होण्यासाठी जिल्ह्याबाहेर ञअसलेली कार्यालये जिल्ह्यात आणावीत अशी मागणी अनेकवेळा वार्तापत्रामार्फत बळवंत वालेकर यांनी केली . मंत्री , मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेतही मागणी केली.मंत्रालयात जाऊनही मुख्यमंत्री यांना अनेकवेळा जाब विचारला. जिल्हा परिषदेकडून अनुकूल ठराव करवून ते संबंधित विभागाकडे पाठविले. त्यामुळे जिल्हा दूरसंचार कार्यालय पनवेल येथे , जिल्हा पासपोर्ट कार्यालय अलिबागेत तर जिल्हा कामगार न्यायालय महाड येथे आणण्यात पत्रकार वालेकर यशस्वी ठरले. पैकी जिल्हा कामगार न्यायालय अलिबाग येथे हलविण्यास उच्चन्यायालयाने परवानगी दिली असून न्यायालयासाठी इमारतीची सुविधा जिल्हाधिकारी यांनी केली आहे.,फर्निचरसाठी निधी उपलब्ध होताच पुढील कार्यवाही होऊ शकेल.
उच्चविद्याविभूषित असलेल्या वालेकर सरांचे शैक्षणिक क्षेत्रातही योगदान आहे. ९ प्राथमिक शाळा चालविणा-या अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत . अलिबागचे सुपुत्र व भारताचे माजी लष्कर प्रमुख “शहीद” अरुणकुमार वैद्य यांची १० आॕगष्ट ही पुण्यतिथी शासकीय इतमामाने साजरी व्हावी तसेच “शहीद” वैद्य यांचे तैलचित्र अलिबाग येथे पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयासमैर लावण्यासाठी पत्रकार वालेकर प्रयत्नशील असून ही प्रकरणे मंत्रालयीनस्तरावर विचाराधीन आहेत. दै. लोकसत्ताची बातमीदारी व “कुलाबावैभव”चे संपादकपद असल्यामुळे बातम्यांची सर्वत्र घेतली जात असे. म्हणून ‘बळवंत मी , यशवंत मी’ हे आत्मकथनपर पुस्तक अल्पावधीत वाचकप्रिय झाले. सामाजिक कामे करण्यासाठी वालैकर सरांना दीर्घायुरारोग्य लाभो हीच शुभेच्छा!



