
0
4
8
2
9
0
अनपेक्षित
अनपेक्षित ती भेट
झाली कातर वेळी
सहजीवनाचा साथी
भाग्य लिहिले भाळी
अचानक गाठभेट ती
कोण कुठला तो कळेना
वेड म्हणू की ओढ म्हणू
बघून त्याला मन भरेना
एक सांज अशीही आली
सख्याची सोबत झाली
अनपेक्षित ही सुखाची चाहूल
हृदयी प्रीत फुलवून गेली
भावनांना त्याने दिली साद
किनारा मिळाला जीवनी
आशा झाल्या बोलक्या
स्वप्ने फुलली मज नयनी
अंधारलेली दिशा मनाची
ताऱ्यापरी उजळून आली
असा मिळाला जीवलग
कल्पनेनेच मोहरून गेली
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल, जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
0



