Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“अगं बाई अरेच्चा” – एक सामाजिक भाष्य: वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 3

“अगं बाई अरेच्चा” – एक सामाजिक भाष्य: वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

“अगं बाई अरेच्चा!” हे वाक्य आपल्या मराठी माणसाच्या मनात खोलवर रुतलेलं आहे. तसं पाहिलं तर हे एक साधंसं वाक्य, पण त्यामागं असतो एक भावनांचा पूर. आश्चर्य, गमतीशीर प्रतिक्रिया, हलकी शी थट्टा, कधी काळजी तर कधी कौतुक – या साऱ्यांचं एकत्रित रूप म्हणजेच ‘अगं बाई अरेच्चा!’ कधीकधी अनपेक्षित घटना घडतात. काही विनोदी प्रसंग घडतात. तेव्हा या वाक्याचा वापर आपल्या घरी, गल्लीत, बाजारात, शेजारपाजारच्या गप्पांमध्ये आपल्याला बघायला मिळतो.एखादी नवीन गोष्ट ऐकली की, एखादी भन्नाट घटना घडली की किंवा कोणी कुठलं तरी अनपेक्षित पाऊल टाकलं की – “अगं बाई अरेच्चा!” हा शब्द आपोआप ओठांवर येतो. ही केवळ प्रतिक्रिया नसून ती आहे जीवनाकडं बघण्याची खास स्त्रीसुलभ शैली – जिथं हसत खेळत, गप्पांमध्ये मिसळून भावनांचा झरा वाहतो.

या वाक्याचं सौंदर्य त्याच्या उच्चारात आहे. शब्द कमी, पण परिणाम मोठा. पूर्वी घराघरातल्या बायका, शेजारणी यांचं हे खास वाक्य असायचं. पण जसजसा काळ बदलत गेला, तसतशा स्त्रियांच्या भूमिका बदलल्या. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्या सक्रिय झाल्या, आणि त्यांचं ‘अगं बाई अरेच्चा’सुद्धा अधिक प्रगल्भ, विचारमूल्य असलेलं होऊ लागलं. आता हे वाक्य केवळ हास्य किंवा थट्टा व्यक्त करत नाही, तर अनेकदा प्रश्नही उपस्थित करतं – “अगं बाई अरेच्चा! अजूनही एवढा अन्याय?” किंवा “अगं बाई अरेच्चा! एवढं शिकूनसुद्धा फरक का?”

“अगं बाई अरेच्चा” हे फक्त एक वाक्य नाही, ती आपल्या समाजातील स्त्रीची, तिच्या भावनांची आणि संवादशैलीची एक जिवंत खूण आहे. “अगं बाई अरेच्चा!” हे शब्द आपल्याला आपल्या बोलीभाषेची, खास मराठी पणाची आठवण करून देतात. ते फक्त शब्द नसून, एक भावना आहे – कधी हसवणारी, कधी चकित करणारी आणि कधी गमतीशीर गोष्ट सांगणारी!अशा या आपल्या खास मराठी शब्दांनीच तर आपली भाषा इतकी रंगीबेरंगी, ढंगदार आणि गोड वाटते. राहुल सरांनी आज काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी दिलेला ‘अगं बाई अरेच्चा’ विषय हटके आहे. शिलेदारांनी स्पर्धेला छान प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!

वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे