
0
4
8
2
9
3
धबधबा
पांढरा शुभ्र धबधबा
उंचावरून वाहतो
किती सुंदर भासतो
सौंदर्य मन मोहवितो
भिती ना कसली त्याला
सरसर खाली वाहत जातो
जगावे कसे हे माणसाला
शिकवण देऊन जातो
कडेकपारी येऊन जातो
निर्मळ पाणी देऊन जातो
बघता दृष मनोहर त्याचे
निसर्ग किमया दावून जातो
सुरेख हा खुणावे धबधबा
बिनधास्त नित्य वाहत राही
बालमनाला आनंद देऊन
खिळवून ठेवी मोठ्यानाही
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि.चंद्रपूर
========
0
4
8
2
9
3



