‘वाईस ऑफ मीडिया’ भिवापूर तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
रजत डेकाटे - प्रतिनिधी नागपूर/भिवापूर

‘वाईस ऑफ मीडिया’ भिवापूर तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
रजत डेकाटे – प्रतिनिधी
नागपूर/भिवापूर
नागपूर/भिवापूर : वाईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमशी संलग्न असलेल्या भिवापूर तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. तालुका संघाच्या अध्यक्षपदी साबीर पटेल, तर सचिवपदी राम वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी स्थानिक बहुजन नागरी पतसंस्था सभागृहात आयोजित बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्षपदी मनोहर वानखेडे, उपाध्यक्षपदी रंजीत रक्षीए, सहसचिवपदी प्रिती जांभुळकर आणि कोषाध्यक्षपदी जितेंद्र धोटे यांची निवड करण्यात आली.
तसेच नागपूर जिल्हा कार्यकारिणीत रजत डेकाटे यांची नागपूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली.कार्यकारिणीच्या सदस्यपदी मिथुन दुपारे, नारायण चौधरी, अरुणकुमार तालेवार आणि विजय लांजेवार यांची निवड करण्यात आली. तसेच ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर यांची संघाच्या मुख्य मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वाईस ऑफ मीडिया उपाध्यक्ष विनोद मेश्राम आणि नागपूर शहराध्यक्ष आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय नागपूर येथून प्रशांत ठाकरे, राजू कापसे, चंद्रकांत भोयर, चंदू मडावी, गिरीष आंदे, भोजराज नागपूरे, विनायक इंगळे, रोशन पाटील आणि बावनकर यांचीही उपस्थिती होती.
यावेळी लव जनबंधू, किरण नागरीकर, रोशन गायधने, मुकेश गायगवडी, गौतम भशारकर, चंद्रमणी टेंभुर्णे, नरसिंह धनविजय, जयश्री रामटेके आणि हाजी नासीर यांनी उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक समस्या, जनतेचे विविध प्रश्न आणि स्थानिक पातळीवरील समस्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी संघाने सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



