Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणे

युवा क्रांती व वसुधा फाउंडेशनतर्फे ‘शोध वृद्धाश्रमा’तील वृद्धांना वडापाव, भजी मेजवानी

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 5 7 4 4 8

युवा क्रांती व वसुधा फाउंडेशनतर्फे ‘शोध वृद्धाश्रमा’तील वृद्धांना वडापाव, भजी मेजवानी

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

बिनधास्त न्यूज मिडीया

पुणे: शोध वृद्धाश्रम, मांजरी, कोलवडी, मदने वस्ती इथे आहे. या वृद्धाश्रमाच्या संस्थापक ज्योती संतोष पटाईत या आहेत. या ताई आठवी शिकलेल्या आहेत. परंतु त्यांना समाजाविषयी काहीतरी करावे ही भावना असल्याने त्यांनी पंचवीस वृद्ध यांना आपल्या निवासस्थानी जागा देऊन त्यांची सेवा करणं चालू केलं. ज्या जागेत त्या त्यांच्या आता संगोपनच म्हणूया करत आहेत तर ती जागा सुद्धा त्यांची भाड्याची आहे. नवीन जागा बांधकाम चालू आहे. गेली आठ वर्ष सतत त्यांचे हे कार्य चालू आहे. या कार्याला त्यांचे पती मुलं आई-वडील सर्वजण चांगले साथ देत आहेत.

जगाची माय सिंधुताई सपकाळ यांच्याकडे त्या काही दिवस कामाला होत्या आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हे कार्य सिद्धीस नेत आहेत. यांच्याकडे असणाऱ्या ज्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्यांच्याच नातेवाईकांनी अक्षरश: मारहाण करून बाहेर काढले आहे. काहींचे या जगामध्ये कोणीच नाही पक्षाच्या रस्त्यावर असताना त्यांना या ताईंनी उचलून आणून आपल्या वृद्धाश्रमात जागा दिलेली आहे. अशा 22 जणींचे मन मी वाचले ऐकले. त्यांच्या मनाची काय अवस्था असेल हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. काय आपल्याच नातेवाईक असं करू शकतात? हा प्रश्न मनामध्ये घोंगावत होता.

आई-वडिलांची सेवा मुलाने करावीच हे जरी न्यायालयाने सांगितले असेल तरीसुद्धा अशा केसेस या ठिकाणी बघायला मिळाल्याने हमखास प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये हे बघायला मिळते. मी स्वतः निवारा वृद्धाश्रम, आपुलकी वृद्धाश्रम,आता हा शोध वृद्धाश्रम अशा अनेक वृद्धाश्रमांना भेटी दिलेल्या आहेत. यातून एक सूचित करावेसे वाटते की आपले आई वडील लहानपणी आपल्याला हात धरून शिकवतात. सर्व कृती करायला प्रथम आई शिकवते.बाबा शिकवतात, तर यांचा कठीण काळामध्ये मुलांनी साथ दिलीच पाहिजे, वृद्ध झाले म्हणून त्यांना टाकून द्यायचे का? त्यांना स्वतःचे काही करायला जमत नाही म्हणून टाकून द्यायचे का? हे मनाला न पटणारे आहे. यामागे काय कारण आहे?? असे सारखे मनात येऊन जाते.

बऱ्याच घरांमध्ये राग, द्वेष, मस्तर हे पाहिले जाते. प्रेम आपुलकी माया फार कमी घरांमध्ये दिसते. एकमेकांसाठी जगावे एकमेकांसाठी मरावे हे तर लांबच राहिले आहे. जरा आई वडील वृद्ध झाले की त्यांना त्रास होतो आपल्या आई वडिलांचा. त्यांना हेही कळत नाही आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी किती खस्ता खाल्लेले आहेत कसं शिकवलं? पैसा खूप नसताना देखील कसे मार्गी लावलं हे त्यांना कळत नाही. आजकाल फक्त मी आणि माझं कुटुंब म्हणजे बायको आणि मुलं एवढंच पाहिलं जातं. म्हाताऱ्या आई बापाने कोणाकडे जायचं कोणाकडे दाद कोणाकडे मागायची. यांची मुलं मोठी होईपर्यंत आई-बाबा आवडतात कारण ते नोकरीला गेले की मुलांचा सांभाळ होतो व पाळणा घरात ठेवायला नको. बिना पैशाचे मूल सांभाळले जाते. याला म्हणतात मतलबी लोक. तर अशा मतलबी लोकांनीच वृद्धाश्रमामध्ये आपल्या आई वडिलांना ठेवले आहे. काम झाले द्या हाकलून… अशी वृत्ती आजच्या या पिढीमध्ये आहे.हल्ली स्वतःकडे बघायला वेळ नाही असे झाले आहे. तर वृद्धांकडे कोण लक्ष देणार.

वृद्धांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. आजचा तरुण बारा बारा तास काम करत आहे. त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याची बायको सुद्धा काम करत आहे. याचे कारण वाढते महागाई आणि जीवनमान जगण्याची पद्धती. सगळे कसे लॅविश हवे. मग तिथे वृद्धांची अडचण नको. मग वृद्धाश्रमामध्ये ते पण उंची वृद्धाश्रमामध्ये अशी मुलं आपल्या आई वडिलांची रवानगी करतात. पण या पिढीला कळत नाही की पुढे आपण हे म्हातारे होणार आहोत. मग आपली रवानगी आपल्या मुलाने तिथे केली तर चालेल का?? याविरुद्ध आपल्या आई-वडिलांना छान जपणारे अनेक आहेत.

हे आपल्या आई वडिलांनी,आजोबा आजींना सांभाळलेले बघितलेले असते. त्यांच्यावर केलेले प्रेम पाहिलेले असते. आणि मग अशी लोकं जरी स्वतःला वेळ नसेल तरीसुद्धा एखादी केअर टेकर घरामध्ये आणून ठेवतात, आणि तिच्याबरोबर असे आपले मुलं आपले आई वडील सोडून जातात पण तेवढेच त्यांना आई-वडिलांना घरचे समाधान लाभते. नातवंडात खेळण्याचे सुख लाभते. तर मला एवढेच म्हणायचे आहे की या शोध वृद्धाश्रमामध्ये मी जाऊन आले तेथील परिस्थिती मी बघितली या ताई त्या वृद्धांची उत्तम काळजी घेतात त्यांची आणि त्यांना मी जी वडापावची, भजीची मेजवानी दिली त्यांना खूप आनंद झाला. त्याचबरोबर मी भजन आणि आनंदाची गाणी घेतली त्यात त्यांना सामावून घेतले त्यामुळे या सर्व वृद्धा खूप आनंदी होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना मी पाहत होते.

त्यातील एकीने दोन भजन गयीली. माझी गाण्याची वही चाळली. या वृद्धाश्रमातील एक वृद्धा नव्वद वर्षाच्या होत्या तर एक 100 वर्षाच्या होत्या. यांना मी फक्त वडापावची मेजवानी दिली पण मी स्वतः अनेकांचे आशीर्वाद बरोबर घेऊन गेले. आशीर्वादामध्ये एक ताकद असते. ती ऊर्जा ती ताकद मी मिळवली होती. माझ्याबरोबर माझी चार नातवंड, मुली, माझे व्याही, विहीण आणि सुनबाईचे आजोबा अण्णा बरोबर होते. त्यांनी चहासाठी दुध दिले. शोध वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांचे आशीर्वाद आम्हा सर्वांना लावले त्याबद्दल मी शोध वृद्धाश्रमाच्या ज्योती ताईंचे आभार मानते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे