Breaking
कवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

माझे बाबा

कुसुम पाटील, कसबा बावडा जि.कोल्हापूर

0 4 8 2 9 4

माझे बाबा

माझे बाबा घराचा आधार
पदोपदी संकटात जिंकण्या संघर्ष
कष्टकरी संयमाचा बांध घालुनी
शोषिका बापच माझा आदर्श

मला आहे त्याचा अभिमान
जगण्यास पदोपदी बळ दिले
आत्मविश्वास नसानसात भरला
दिनरात कष्ट करूनच गेले

मी जेव्हा चालली सासरी
बापाची डोळे आले भरुनी
बाप माझा होता पहाडासारखा
नव्हती कशाची काळजी जीवनी

माझे बाबा होते भोळा सांब
वादळांना पचवून केले संरक्षण
नात्यागोत्याचा कुटुंब प्रमुख
बहिण भावावर सुखाची कमान

वय झाले तरी नव्हता आजार
कष्ट मात्र केले स्वच्छ टापटीप
आम्हा भावंडांची केली हौसमौज
पाठीराखा होता माझा बाप

आदर्श संस्कार केले आम्हावर
परंपरा रुढी घालून दिला
सणवार नातीगोती टिकवली
नात्यागोत्यात आदर्श झाला

बाबा माझे देव कुटुंबासाठी
परिश्रम नित्य करी सर्वांसाठी
घराचा प्रकाशमान माझे बाबा
आम्हा सर्वांसाठी सावलीची गाठी

माझा बाप वाघा समान
झुकला नाही कुणासमोर
जरभ त्याचा धाक होता
प्रेम शब्दापेक्षा कृतीतून दाखवणारे

कुसुम पाटील, कसबा बावडा
जि.कोल्हापूर

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे